सरन्यायाधीश भूषण गवईंची बालपणीच्या शाळेला भेट (VIDEO)

 


मुंबई, ६ जुलै २०२५: देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज मुंबईतील गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोडकर विद्यालयाला भेट देऊन आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. संस्थेतर्फे सरन्यायाधीश गवई यांचे यावेळी हृदयपूर्वक स्वागत आणि सत्कार करण्यात आला.   

या कार्यक्रमात सरन्यायाधीश गवई यांनी, आपण प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेतलेल्या या शाळेविषयी आणि आपली जडणघडण करणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. "आपण स्वतः मराठी माध्यमातून शिकलो आहोत. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विषयांची समज अधिक पक्की होती," असे त्यांनी आवर्जून सांगितले. शिक्षणासोबतच संस्कार रुजतात आणि हेच संस्कार आयुष्यभर साथ देतात, असा विश्वास त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

सरन्यायाधीश गवई यांनी शाळेची पाहणी केली, तसेच सोबत शिकलेल्या आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकासमंत्री आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जमादार हे उपस्थित होते. गवईंच्या या भेटीमुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासनात उत्साहाचे वातावरण होते.

Chief Justice Bhushan Gavai, School Visit, Marathi Medium Education, Nostalgia, Gratitude, Mumbai, Education Importance, Values   

#ChiefJustice #BhushanGavai #MarathiEducation #SchoolVisit #Mumbai #Education #Values #Inspiration #Girgaon 

सरन्यायाधीश भूषण गवईंची बालपणीच्या शाळेला भेट (VIDEO) सरन्यायाधीश भूषण गवईंची बालपणीच्या शाळेला भेट (VIDEO) Reviewed by ANN news network on ७/०७/२०२५ ०५:१५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".