पुणे: अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील ३ लाख ९८ हजार शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३३७ कोटी ४१ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी आज दिली. याबाबतचा शासन निर्णय (GR) देखील जारी करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीची दखल घेत जिल्हा प्रशासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवले होते. या अहवालांच्या आधारेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आल्याचं मंत्री पाटील यांनी सांगितलं. "शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे," अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
Maharashtra Farmers, Unseasonal Rain, Hailstorm, Crop Loss, Government Aid, Farmer Relief Fund
#MaharashtraFarmers #UnseasonalRain #FarmerAid #CropLoss #MaharashtraGovernment #MakarandJadhavPatil #FarmersRelief
Reviewed by ANN news network
on
७/२७/२०२५ ०९:३६:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: