पुणे, दि. २६ जुलै २०२५: भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या वार्षिक विशेषांक **'कर्मयोद्धे'**चे प्रकाशन महाराष्ट्रभरात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आज पुण्यात 'कर्मयोद्धे' विशेषांकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, दत्ता भरणे आणि संघटनेचे पुणे विभागीय उपाध्यक्ष प्रकाश भिलारे यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सदर्न कमांडचे प्रमुख धीरज सेठ आणि सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्यचे संचालक (निवृत्त) कर्नल दीपक ठोंगे यांना संघटनेची माहिती आणि हा विशेषांक देण्यात आला.
यावेळी संघटनेचे कार्यकारी संपादक व पुणे विभागीय उपाध्यक्ष प्रकाश भिलारे, मोहिते, पुणे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, माजी सरचिटणीस बाळासाहेब जाधव, राज्य सल्लागार दिलावर शादीवान, कारगिल योद्धे व आजीवन सदस्य गवळी आणि इतर सदस्य उपस्थित होते.
राज्यभरात प्रकाशन सोहळे
सातारा येथे: माननीय सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व उपसंचालक ले. कर्नल हंगे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. सातारा जिल्हाध्यक्ष नवनाथ इंदलकर, विभागीय सचिव संजय बोराटे, इंदूर, तांदळे, मतकर, घाडगे यांनी यासाठी परिश्रम घेतले.
छत्रपती संभाजीनगर येथे: माननीय मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते विमोचन झाले. यावेळी विभागीय उपाध्यक्ष विजय गोरे, जिल्हा पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच, महाराष्ट्रभरात सर्व जिल्ह्यांमध्ये संघटनेचे जिल्हा पदाधिकारी यांनी मान्यवरांच्या हस्ते विमोचन करून संघटनेच्या एकीचे दर्शन घडवले आणि सदस्यांना हा विशेषांक वितरित केला.
'कर्मयोद्धे'चे महत्त्व
हा विशेषांक संघटनेचे प्रचार आणि प्रसाराचे प्रभावी माध्यम व मुखपृष्ठ आहे. तो माजी सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची भूमिका निभावेल असा विश्वास प्रकाश भिलारे यांनी व्यक्त केला.
Reviewed by ANN news network
on
७/२६/२०२५ ११:०४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: