पुणे, १२ जुलै २०२५: पुणे शहर पोलीस आयुक्त परिमंडळ ४ हद्दीतील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी १२ जुलै २०२५ रोजी पहाटेपासून 'मासरेड' मोहीम राबविण्यात आली. या विशेष मोहिमेत हातभट्टी दारू तयार करणारे आणि देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या एकूण २२ लोकांवर २२ गुन्हे दाखल करून, २,९२,५६०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात ५०८.२ लिटर हातभट्टी दारू आणि ५५५० लिटर रसायन नष्ट करण्यात आले, ज्याची किंमत २,८४,०२०/- रुपये आहे.
उप आयुक्त
परिमंडळ ४, सोमय
मुंडे यांनी अवैध
धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश
दिले होते. त्यानुसार, ३१ पोलीस अधिकारी आणि
७२ पोलीस अंमलदारांची विशेष
पथके तयार करून
ही मोहीम राबविण्यात आली.
परिमंडळ ४
मधील विविध पोलीस
ठाण्यांच्या हद्दीतील डोंगराळ भागात आणि नदी
परिसरात लपून-छपून हातभट्टी तयार
करून त्याची साठवणूक व
विक्री करणाऱ्यांवर तसेच
देशी-विदेशी मद्याची अवैध
विक्री व्यवसाय करणाऱ्यांवर ही
कारवाई करण्यात आली.
ही
कारवाई परिमंडळ ४
मधील पोलीस स्टेशनकडून करण्यात आली.
Illegal Liquor, Police Raid, Pune Crime, Alcohol Smuggling, Law Enforcement
#PunePolice #IllegalLiquor #CrimeAction #Zone4
#MassRaid

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: