पुणे, १२ जुलै २०२५: पुणे शहर पोलिसांच्या सहकारनगर पोलीस स्टेशनने १० जुलै २०२५ रोजी मानवी तस्करी आणि अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या
प्रकरणातील फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, पीडित 'निर्भया' हिला
तिची मावस बहीण
तमन्ना उर्फ पारुल
मुख्तार शेख (अंदाजे वय
२५ वर्षे) हिने
बांगलादेशातून
खोटे बोलून बंगळूरु येथे
बोलावले. बंगळूरु येथे आल्यावर तिला
धमकावून एका इसमाच्या मार्फतीने स्वतःच्या आर्थिक
फायद्यासाठी वेश्याव्यवसाय
करण्यास भाग पाडले. त्यानंतर, तमन्नाने पीडित निर्भयाला बंगळूरुहून बुधवार
पेठ, पुणे येथे
बोलावून मित्र अभिषेक प्रकाश
संथेबेन्नुर (वय २२ वर्षे,
रा. गोपानकोपा, सित्तप्पा मंदिराजवळ, हुबळी,
धारवाड, कर्नाटक) याच्या
सहभागाने पुन्हा आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करण्यास भाग
पाडले.
पीडित
निर्भयाने या वाईट कामास
नकार दिल्यावर तिला
एका खोलीत कोंडून
ठेवण्यात आले. तिला हाताने
आणि बेल्टने मारहाण
करून शिवीगाळ करत
गायब करण्याची धमकीही
देण्यात आली. या प्रकरणी सहकारनगर पोलीस
स्टेशनमध्ये गु.र.नं.
२८५/२०२५ भा.न्या.सं.क.
१४२, १४३(२), ११८(१),
११५(२), ३(४), बालकांचे लैंगिक
अत्याचारापासून
संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम
४, ६, १७
पीटा ॲक्ट ४,
५, ६, पारपत्र (भारतामध्ये प्रवेश)
१९५० चे कलम
३(अ), ६(अ) सह विदेशी
व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम
१४(३७) प्रमाणे गुन्हा
दाखल करण्यात आला
होता.
गुन्ह्याच्या तपासात,
पोलीस पथकाने वरील
महिला व इसमाला
ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांची नावे
अभिषेक प्रकाश संथेबेन्नुर (वय
२२ वर्षे, गोपानकोपा, सित्तप्पा मंदिराजवळ, हुबळी,
धारवाड, कर्नाटक) आणि
तमन्ना मुख्तार शेख
(रा. मामा फेंके
येथे पहिल्या मजल्यावर खादीजा
खातून यांचे घरी
भाडेतत्त्वावर
पुणे) अशी सांगितली. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता,
त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक
करण्यात आली आहे.
ही
कारवाई वरिष्ठ निरीक्षक, राहुल गौड,
निरीक्षक (गुन्हे)
सुरेखा चव्हाण, सहा.
निरीक्षक सागर
पाटील, उपनिरीक्षक कल्पना
काळे, अंमलदार फिरोज
शेख, सद्दाम हुसेन
फकिर, मिरा किंद्रे आणि
तपास पथकाचे अंमलदार यांनी केली.
Human Trafficking, Child Exploitation, Pune Police, Crime News
#PunePolice #HumanTrafficking #ChildProtection #CrimeNews #SahkarnagarPolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: