गुरुपौर्णिमेला चिरनेरहून वहाळकडे साई दिंडी प्रस्थान करणार

 


उरण, दि. ४ जुलै २०२५ (प्रतिनिधी): गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी हिंदू धर्मातील प्रसिद्ध सणांपैकी एक असलेल्या गुरुपौर्णिमा हा सण आहे. या गुरुपौर्णिमा सणाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ॐ साई सेवा मंडळ चिरनेर तर्फे श्री महागणपती मंदिर चिरनेर (उरण) ते श्री साई मंदिर वहाळ (पनवेल) दरम्यान श्री साईबाबांच्या पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री महागणपती मंदिर चिरनेर येथून वारकरी दिंडी पदयात्रा गुरुवार, दि. १०/७/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता श्रीची आरती करून साई मंदिर वहाळ येथे प्रस्थान करणार आहे. यंदाचे हे पदयात्रेचे १३ वे वर्ष आहे.

सदर पदयात्रा यशस्वी करण्यासाठी ॐ साई सेवा मंडळ चिरनेरचे कार्याध्यक्ष गजानन फुंडेकर, अध्यक्ष अमित मुंबईकर, उपाध्यक्ष नितीन नारंगीकर, सचिव संतोष चिर्लेकर, खजिनदार प्रसाद पाटील, सल्लागार बबन ठाकूर, गजानन म्हात्रे, हरिश्चंद्र मोकल आणि रमेश म्हात्रे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य विशेष मेहनत घेत आहेत. तरी सर्व साईभक्तांनी दिंडी मध्ये सहभागी होऊन श्री साईचा कृपाशिर्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आणि दिंडी मध्ये सहभागी होण्यासाठी अध्यक्ष अमित मुंबईकर (फोन नंबर ८४५२९३७३८२) आणि उपाध्यक्ष नितीन नारंगीकर (फोन नंबर ८४५४९३७९६६) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

Local News, Religion, Festival, Pilgrimage, Uran 

 #GuruPurnima #SaiBaba #PalkhiDindi #Chirner #Wahal #ReligiousEvent #Uran

गुरुपौर्णिमेला चिरनेरहून वहाळकडे साई दिंडी प्रस्थान करणार गुरुपौर्णिमेला चिरनेरहून वहाळकडे साई दिंडी प्रस्थान करणार Reviewed by ANN news network on ७/०४/२०२५ ०९:३२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".