फुंडे हायस्कूलमध्ये श्री रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळाकडून विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

 


उरण, दि. ४ जुलै २०२५ (प्रतिनिधी): शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे, उरण येथे इयत्ता पाचवी ते दहावी अखेरच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.

विद्यालयाचे प्राचार्य बी. बी. साळुंखे, लेखनिक नवनीत ठाकूर व उपशिक्षक दिगंबर पाटील यांच्या प्रयत्नातून श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने सुमारे ३००० वह्यांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. दातृत्वाचा महामेरू, शिक्षण प्रेमी, रयत शिक्षण संस्थेचे मैनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे दरवर्षी श्री. रामशेठ ठाकूर विकास मंडळाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये मोफत वह्या वाटप करीत असतात. याचा लाभ फुंडे विद्यालयांच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी होत असतो.

या वाटप सोहळ्याला विद्यालयाचे चेअरमन कृष्णाजी कडू, विद्यालयाचे प्राचार्य बी. बी. साळुंखे, स्कूल कमिटीचे सदस्य सुरेश म्हात्रे, दिलीप तांडेल, उपमुख्याध्यापिका एस. डी. थोरात, पर्यवेक्षिका एस. एम. बाबर आणि एस. एस. पाटील, गुरुकुल प्रमुख ए. आर. म्हात्रे तसेच शिक्षण वृंद उपस्थित होता. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख एच. एन. पाटील यांनी केले. विद्यालयाच्या वतीने श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे व पनवेल तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे आभार मानण्यात आले.

Local News, Education, Philanthropy, Student Support, Uran 

 #NotebookDistribution #StudentAid #RamshethThakur #FundeHighSchool #EducationSupport #Uran

फुंडे हायस्कूलमध्ये श्री रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळाकडून विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप फुंडे हायस्कूलमध्ये श्री रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळाकडून विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप Reviewed by ANN news network on ७/०४/२०२५ ०९:३५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".