श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था आणि ओम साई सार्वजनिक पदयात्रा मंडळातर्फे भक्तांना प्रसाद वाटप
गुरुवार, दिनांक १० जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता श्री महागणपती मंदिरात श्रींची आरती करून ही दिंडी पदयात्रा वहाळच्या दिशेने प्रस्थान झाली. ही पालखी गव्हाण फाटा येथे आल्यानंतर, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तसेच ओम साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ कोप्रोली यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त पायी जाणाऱ्या पदयात्रींना आणि साई भक्तांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तसेच ओम साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ, कोप्रोलीचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. साई भक्तांनी या उपक्रमाचे कौतुक केले. चांगल्या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल ॐ साई सेवा मंडळ, चिरनेर यांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तसेच ओम साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ, कोप्रोलीच्या पदाधिकारी व सदस्यांचा सन्मानचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: