शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटेंनी केले अभिनंदन; विविध समाजातील नेत्यांचा समावेश, पक्षात उत्साहाचे वातावरण
पिंपरी-चिंचवड, १२ जुलै २०२५: भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी २०२५ ते २०२७ या कालावधीसाठी जाहीर केलेल्या राज्य परिषद सदस्यांच्या यादीत पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक अनुभवी नेत्यांचा समावेश झाल्याने शहरात उत्साहाचे वातावरण आहे. या नवनिर्वाचित सदस्यांचा पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सदस्यांचा समावेश:
राज्य परिषद सदस्यपदी निवड झालेल्यांमध्ये विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, अमित गोरखे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, पक्षाचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते पाटीलबुवा चिंचवडे, कामगार नेते हनुमंत लांडगे, आणि मातंग समाजातील युवा भाजप कार्यकर्ते धर्मेंद्र क्षीरसागर यांचा समावेश आहे. या निवडीमुळे समाजातील विविध घटकांना पक्षाशी जोडण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. या महत्त्वपूर्ण यादीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते, मंत्री, खासदार आणि आमदार यांचाही समावेश आहे. पक्षाची ध्येयधोरणे पुढे नेण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी या सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
सत्कार सोहळा आणि उपस्थितांची मांदियाळी:
पिंपरी-चिंचवड शहर भाजप कार्यालयात आयोजित या सत्कार सोहळ्यात शहराध्यक्ष बापू काटे यांनी या नवनिर्वाचित सदस्यांपैकी उपस्थित राज्य परिषद सदस्य उषा उर्फ माई ढोरे, अनुप मोरे, पाटीलबुवा चिंचवडे व हनुमंत लांडगे यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पक्षासाठी केलेल्या योगदानाला आणि त्यांच्या भविष्यातील कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी, शहर सरचिटणीस शैला मोळक, महिला मोर्चा शहराध्यक्ष सुजाता पालांडे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मनोज ब्राह्मणकर, युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अजित कुलथे, भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास सानप, कायदा आघाडीचे शहराध्यक्ष ॲड. गोरक्षनाथ झोळ यांच्यासह शिवराज लांडगे, राजाभाऊ मासुळकर, दिनेश यादव, हरिभाऊ चिंचवडे, प्रवीण कुंजीर, बाळासाहेब परघळे, दीपक गांगुर्डे, आदित्य काटे आदी प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: