पुण्यात खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या गुन्हेगारांना २४ तासांत अटक, चंदननगर पोलिसांची कामगिरी

 


पुणे, ०५ जुलै २०२५: खंडणीसाठी एका व्यक्तीचे अपहरण करणाऱ्या तीन गुन्हेगारांना चंदननगर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३०/०६/२०२५ रोजी एक व्यक्ती कुबा मस्जिदजवळ, वडगाव शेरी, पुणे येथे कामावर जात असताना काही अज्ञात आरोपींनी त्याचे अपहरण केले. आरोपींनी अपहरण केलेल्या व्यक्तीच्या सुटकेसाठी फोनद्वारे २,००,०००/- रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी पीडित व्यक्तीच्या पत्नीने चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती, ज्यानुसार गु.र.नं. २४६/२०२५, भा.न्या.सं. कलम १४० (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सपोनि, विकास बाबर, चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

गुन्ह्यातील पीडित व्यक्ती आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. या माहितीच्या आधारे, पोलीस उप-निरीक्षक अजय असवले, पोलीस अंमलदार शिंदे आणि लहाने यांच्या पथकाने माजलगाव, जि. बीड येथून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे: १) गौतम केरुजी पोटभरे (वय ३७ वर्षे, रा. मु.पो. राजेवाडी, ता. माजलगाव, जि. बीड), २) अभिजीत वसंत पोटभरे (वय २७ वर्षे, रा. मु.पो. राजेवाडी, ता. माजलगाव, जि. बीड) आणि ३) शुभम वसुदेव मायकर (वय २५ वर्षे, रा. मुकेंडे पिपरी, पो. राजेवाडी, ता. वडवणे, जि. बीड) अशी आहेत.

पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून पीडित व्यक्तीची गुन्हा घडल्यापासून २४ तासांच्या आत सुखरूप सुटका केली आणि या मोठ्या गुन्ह्याचा उलगडा केला.

 Crime, Abduction, Extortion, Pune Police, Chandan Nagar, Arrest, Kidnapping 

#PunePolice #ChandanNagarPolice #Abduction #Extortion #CrimeNews #Pune #PoliceAction

पुण्यात खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या गुन्हेगारांना २४ तासांत अटक, चंदननगर पोलिसांची कामगिरी पुण्यात खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या गुन्हेगारांना २४ तासांत अटक, चंदननगर पोलिसांची कामगिरी Reviewed by ANN news network on ७/०५/२०२५ १०:१८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".