पिंपरी-चिंचवड, १३ जुलै २०२५: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना, आम आदमी पार्टीने (आप) शहरासाठी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या महत्त्वपूर्ण नेतृत्वाच्या पुनर्रचनेत डॉ. अनिल रॉय यांची पिंपरी-चिंचवड महानगराच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी श्री. प्रकाश जरवाल यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
डॉ. अनिल रॉय यांची कार्यक्षमता लक्षात घेऊन, ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पक्षाचे संघटन बळकट करणे, आगामी महानगरपालिका निवडणुकीची रणनीती आखणे आणि स्थानिक प्रश्नांवर अधिक ठोस भूमिका घेऊन प्रभावीपणे काम करणे, या उद्देशाने ही नियुक्ती केल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
'आप'च्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अनिल रॉय यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमधील जोश वाढण्यासोबतच, स्थानिक पातळीवर पक्षाची प्रतिमा अधिक मजबूत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. पक्षश्रेष्ठींनी डॉ. रॉय यांच्यावर विश्वास व्यक्त केला असून, स्थानिक समस्यांवर प्रभावीपणे काम करण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचे यातून संकेत मिळाले आहेत. डॉ. रॉय यांची निवड त्यांच्या सामाजिक भान, संघटन कौशल्य आणि जनसंपर्क क्षमतेच्या आधारे करण्यात आल्याचे पक्षाने नमूद केले. त्यांना शहराच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
ही नियुक्ती प्रकाश जरवाल (प्रभारी, महाराष्ट्र राज्य), अजित फाटके पाटील (प्रदेश कार्यकारी अध्यक्ष), डॉ. अभिजीत मोरे (प्रदेश सचिव), सागर पाटील (प्रदेश संयोजन मंत्री) आणि रवीराज काळे (पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष) या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
Aam Aadmi Party, Pimpri-Chinchwad, Dr Anil Roy, Vice President, Political Appointment
#AAP #PimpriChinchwad #AnilRoy #PoliticalNews #PartyLeadership

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: