अविकसित भूखंडांवरून संताप कॉम्रेड भूषण पाटील यांनी बैठकीत सांगितले की, 'खरे तर हे भूखंड विकसित नाहीत, हे प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर लक्षात आले आहे. या जागेवर ३१९ प्लॉट वितरीत केले असून, त्याचे क्षेत्रफळ २ लाख चौरस मीटर आहे. मात्र, ही जमीन 'टेबल प्लॉट' नसून, तेथे रस्ते, गटारे, वीज वितरण, पाणीपुरवठा या कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत.'
शिष्टमंडळाने असेही निदर्शनास आणले की, द्रोणागिरी नोडसाठी २००७ व २०१५ साली भूखंड वितरणाच्या लॉटरी होऊन व इरादा पत्र देऊन सुद्धा त्या प्रकल्पग्रस्तांना भूखंडच मिळाले नाहीत, यावर त्यांनी संताप व्यक्त केला. एवढेच नव्हे, तर चाणजे हद्दीतील जमिनींचे संपादन झालेले नसताना गुंतवणूकदारांनी केलेल्या व्यवहारातील जमिनीच्या फाईल्स सिडकोने जमा करून घेतल्या आणि गुंतवणूकदारांना २२.५% प्लॉट उलवा नोडमध्ये दिले आहेत. 'याचा अर्थ प्रकल्पग्रस्त उपाशी, गुंतवणूकदार तुपाशी ही व्यवस्था सिडकोने निर्माण केली आहे,' असे शिष्टमंडळाने ठामपणे सांगितले.
जोपर्यंत विकसित भूखंड मिळत नाहीत, तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरू राहील, अशी आक्रमक भूमिका यावेळी कॉम्रेड रामचंद्र म्हात्रे यांनी घेतली. या शिष्टमंडळात हेमलता पाटील, संजय ठाकूर आणि भास्कर पाटील हे देखील सहभागी झाले होते.
Local News, Protest, Land Dispute, CIDCO, Political Activism, Uran
#CIDCO #LandDispute #Protest #RamchandraMhatre #DronagiriNode #Uran #ProjectAffected

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: