पिंपरी-चिंचवडमध्ये ब्राह्मण महासंघाकडून दहावी-बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

 


पिंपरी: अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने वाढोकर सभागृह, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, सेक्टर २५, निगडी प्राधिकरण येथे दहावी आणि बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ लेखक व व्याख्याते विवेक  वेलणकर, महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद  कुलकर्णी, माजी महापौर आर.एस. कुमार, माजी नगरसेवक सुरेश भोईर, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक सलीम शिकलगार, अतुल  इनामदार आणि राजेंद्र बाबर आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमात सुमारे २५० विद्यार्थ्यांचा फुलस्केप वह्यांचा सेट आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. समाजातील काही होतकरू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात हातभार लावण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वाटपही करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप कुलकर्णी यांनी केले.  विवेक वेलणकर, डॉ. गोविंद कुलकर्णी आणि अश्विन इनामदार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याच कार्यक्रमात अश्विन इनामदार यांची महासंघाच्या पिंपरी-चिंचवड शहर उद्योजक आघाडी युवा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी महासंघाचे पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस दिलीप कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष पुष्कराज गोवर्धन, प्रदेश चिटणीस संजय परळीकर, कार्याध्यक्ष महेश बारसावडे, महिला अध्यक्षा सुषमा वैद्य, पुणे शहर महिला अध्यक्षा केतकी कुलकर्णी, भूषण जोशी, आनंद देशमुख, शामकांत कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, राहुल कुलकर्णी, वैभव खरे, अभय कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, अजित देशपांडे, प्रवीण कुरबेट, वैशाली कुलकर्णी, धनश्री देशमुख, संध्या कुलकर्णी, ऋजुता कुलकर्णी, अपर्णा खरे, संगीता कुलकर्णी, अनिता कुलकर्णी, राजवाडे, सौ. खरे, मधुवंती वखरे, वरदा बारसावडे, मंदार जोशी इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन अनुपमा कुलकर्णी यांनी केले, तर राजन बुडुख यांनी आभार मानले.

 Student Felicitation, Brahmin Mahasangh, Pimpri-Chinchwad, Education, Scholarship, Community Event 

#StudentFelicitation #BrahminMahasangh #PimpriChinchwad #EducationSupport #CommunityInitiative

पिंपरी-चिंचवडमध्ये ब्राह्मण महासंघाकडून दहावी-बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव पिंपरी-चिंचवडमध्ये ब्राह्मण महासंघाकडून  दहावी-बारावीच्या  यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव Reviewed by ANN news network on ७/१३/२०२५ ०९:५०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".