फरारी आरोपीच्या मुसक्या आवळल्या, पिस्तूल व काडतूस हस्तगत.

 


पुणे, ०३ जुलै २०२५: हडपसर पोलिसांनी एका गुन्ह्यातील फरारी आरोपी विनीत रविंद्र इंगळे (वय २४, रा. सातववाडी, हडपसर, पुणे) याला लोहीया गार्डन, हडपसर गावठाण परिसरातून अटक केली आहे.  त्याच्याकडून एक देशी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.   

दिनांक ३० जून २०२५ रोजी हडपसर पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड आणि स्टाफ अवैध धंदे प्रतिबंधात्मक कारवाई आणि फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पायी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार महेश चव्हाण आणि अभिजीत राऊत यांना त्यांच्या बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की, हडपसर पोलीस स्टेशन गु.रजि.नं.  ३२२/२०२५ मधील पाहिजे असलेला आरोपी विनीत रविंद्र इंगळे हा लोहीया गार्डन, हडपसर गावठाण येथे येणार आहे.  तसेच, तो काहीतरी संशयित वस्तू स्वतःजवळ बाळगून फिरत असल्याचीही माहिती मिळाली होती.   

 मिळालेल्या माहितीची खात्री पटल्यानंतर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांना कळवण्यात आले.  त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार, पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अभिजीत राऊत, महेश चव्हाण, तुकाराम झुंजार, माधव हिरवे, ज्ञानेश्वर चोरमले यांच्या पथकाने लोहीया गार्डन परिसरात सापळा रचला.  त्यांनी विनीत रविंद्र इंगळे याला ताब्यात घेतले.  दोन पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक देशी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. 

या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गु..नं.  ६२२/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम (२४) महाराष्ट्र पोलीस ॲक्ट कलम ३७() सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उप-निरीक्षक सत्यवान गेंड हे करत आहेत.   

उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निलेश किरवे, निखील पवार, भगवान हंबर्डे, बापु लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महाविर लोंढे, नामदेव मारटकर, माऊली चोरमले, माधव हिरवे, रविकांत कचरे यांनी ही कामगिरी केली.   

Crime, Arrest, Weapon Seizure, Pune Police, Hadapsar

#PunePolice #Hadapsar #CrimeNews #WeaponSeizure #Arrest #MaharashtraPolice

 


फरारी आरोपीच्या मुसक्या आवळल्या, पिस्तूल व काडतूस हस्तगत. फरारी आरोपीच्या मुसक्या आवळल्या, पिस्तूल व काडतूस हस्तगत. Reviewed by ANN news network on ७/०४/२०२५ ०२:०३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".