पिंपरी-चिंचवड महापालिकेत 'विद्युत व लिफ्ट सुरक्षा' कार्यशाळा उत्साहात

 .


पिंपरी, ३ जुलै २०२५: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभाग आणि विद्युत विभागाच्या वतीने राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित 'विद्युत सुरक्षा व लिफ्ट सुरक्षा' या विषयावरील एकदिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली.

पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन महापालिकेचे सह आयुक्त मनोज लोणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे विद्युत निरीक्षण मंडळाचे अधीक्षक अभियंता हेमंत गांगुर्डे, विद्युत विभागाचे सह शहर अभियंता माणिक चव्हाण, विद्युत निरीक्षक नितीन सुर्यवंशी, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेचे धडे

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कामात विद्युत आणि लिफ्ट सुरक्षेबाबत सजग, दक्ष व तत्पर ठेवणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. यामध्ये एलिव्हेटर्स ब्रदर्स असोसिएशनच्या वतीने डॉ. म. ज्ञा. शिंदेह. अ. नाईक यांनी लिफ्ट सुरक्षा या विषयावर सादरीकरण तसेच प्रत्यक्ष बचाव कार्याचे प्रात्यक्षिक सादर केले. विद्युत निरीक्षक नि. ग. सुर्यवंशी आणि नि. धो. मुळुक यांनी 'वीज सुरक्षा' या विषयावर मार्गदर्शन केले.

सखोल मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके

कार्यशाळेत विजेच्या अपघातांची कारणे, सुरक्षा उपाय, वैयक्तिक सुरक्षा साधनांचा वापर, सेफ्टी साहित्यांचा सुरक्षित वापर आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. बचाव कार्यासाठी आवश्यक सीपीआर (CPR) तंत्र आणि विद्युत अपघातांमुळे शरीरावर होणारा परिणाम यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी अग्निशमन विभागाला लिफ्ट बचावासाठी आवश्यक असलेल्या 'लिफ्ट रेस्क्यू कीज' भेट म्हणून देण्यात आल्या. या चाव्यांच्या मदतीने आपत्कालीन प्रसंगी लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांचे अधिक जलद व सुरक्षित बचाव करणे शक्य होणार आहे.


Pimpri Chinchwad, Municipal Corporation, Electrical Safety, Lift Safety, Workshop, Employee Training, Fire Department, Safety Awareness

#PimpriChinchwad #SafetyWorkshop #LiftSafety #ElectricalSafety #PMC #EmployeeTraining #FireSafety #NationalElectricalSafetyWeek

पिंपरी-चिंचवड महापालिकेत 'विद्युत व लिफ्ट सुरक्षा' कार्यशाळा उत्साहात पिंपरी-चिंचवड महापालिकेत 'विद्युत व लिफ्ट सुरक्षा' कार्यशाळा उत्साहात Reviewed by ANN news network on ७/०३/२०२५ ०८:०८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".