पुणे :
शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण
मिळवण्यासाठी पोलीस दल सक्रिय
झाले असतानाच, विश्रांतवाडी
पोलिसांनी पिस्तूलचा धाक दाखवून
दहशत पसरवणाऱ्या एका
सराईत गुन्हेगाराला अटक
केली आहे. राज
ऊर्फ सोन्या रवींद्र
भवार (वय २४,
रा. भिमनगर, विश्रांतवाडी,
पुणे) असे अटक
केलेल्या आरोपीचे नाव आहे.
१०
जुलै २०२५ रोजी
विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या तपास
पथकातील पोलीस अंमलदार संपत
भोसले यांना त्यांच्या
खास बातमीदाराकडून माहिती
मिळाली की, रेकॉर्डवरील
गुन्हेगार राज ऊर्फ
सोन्या भवार हा
धानोरी रोडवरील पाण्याच्या खदानीजवळ
थांबला आहे. तो
हातात पिस्तूल घेऊन
ये-जा करणाऱ्या
लोकांना धमकावत असल्याची माहिती
मिळाली होती. ही
माहिती तात्काळ वरिष्ठांना कळवण्यात
आली.
वरिष्ठांच्या
सूचनेनुसार,अंमलदार संपत
भोसले, संजय बादरे,
अक्षय चपटे यांनी
सापळा रचला. पोलिसांना
पाहताच राज ऊर्फ
सोन्या भवारने कमरेला पिस्तूल
लपवून पळून जाण्याचा
प्रयत्न केला. मात्र,
पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याचा
पाठलाग करून त्याला
पकडले. त्याच्याकडून
एक विदेशी बनावटीचे
पिस्तूल आणि एक
जिवंत काडतूस असा
एकूण ८५,०००/-
रुपये किमतीचा मुद्देमाल
जप्त करण्यात आला
आहे.
याप्रकरणी
विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय
शस्त्र अधिनियम कलम 3(24), महाराष्ट्र पोलीस
कायदा कलम ३७(१) सह
१३५, आणि फौजदारी
कायदा सुधारणा अधिनियम
कलम ३ व ७ अन्वये
गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
ही
कारवाई अपर आयुक्त, मनोज पाटील; उपआयुक्त सोमय मुंडे;
सहायक आयुक्त, विठ्ठल
दबडे; वरिष्ठ निरीक्षक विश्रांतवाडी कांचन
जाधव; आणि निरीक्षक (गुन्हे), मंगेश हांडे यांच्या
मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास
पथकात उपनिरीक्षक
महेश भोसले, अंमलदार बबन वणवे,
यशवंत किर्वे, कृष्णा
माचरे, वामन सावंत,
संजय बादरे, संपत
भोसले, विशाल गाडे, धवल
लोणकर, स्वप्नील कांबळे, अक्षय
चपटे, किशोर भुसारे,
प्रमोद जाधव, होना साबळे
यांचा समावेश होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: