धुळे, ३ जुलै २०२५: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने १ जुलै रोजी धुळे शहरातील एका नागरी वसाहतीतील बनावट मद्य कारखान्यावर छापा टाकला. या कारवाईत तब्बल ३ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी जितेंद्र टेकवाणी या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीसंदर्भात कोणतीही माहिती किंवा तक्रार असल्यास, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागाच्या निरीक्षकांनी केले आहे.
Dhule, Illegal Liquor, Excise Department, Raid, Counterfeit Alcohol, Crime News, Maharashtra Police
#Dhule #IllegalLiquor #ExciseRaid #CounterfeitAlcohol #MaharashtraPolice #CrimeNews #BanaavatMadya
बनावट मद्य कारखान्यावर छापा; ३.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त
Reviewed by ANN news network
on
७/०३/२०२५ ०५:४१:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: