पुणे, १५ जुलै: वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीत गस्तीवर असलेल्या पथकाने एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गावठी बनावटीच्या पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह अटक केली आहे. विकी उर्फ गंग्या विष्णू आखाडे (वय २७) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांना १२ जुलै रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, गोकुळनगर पठारकडून येणाऱ्या रोडच्या उतारावर एका संशयास्पद व्यक्तीची हालचाल दिसून आली. या माहितीच्या आधारे तपास पथकाने शोध मोहीम राबवली. बारटक्के हॉस्पिटलजवळ, वाराणसी सोसायटीकडून अतुलनगर चौकाकडे जाणाऱ्या रोडवरील बस स्टॉपसमोर पोलिसांना आरोपी विकी आखाडे संशयीतरित्या हालचाल करताना आढळला. त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.
आरोपी विकी आखाडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, विनापरवाना शस्त्र बाळगणे आणि वाहनांची तोडफोड असे अनेक गंभीर गुन्हे वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या कारवाईमुळे शहरात अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
ही कारवाई मा. पोलीस उप-आयुक्त श्री. संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त श्री. भाऊसाहेब पटारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत काईंगडे आणि पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश धेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Crime, Illegal Weapon, Arrest, Police Action
#PuneCrime #WarjeMalwadi #IllegalWeapon #PoliceAction #GanjaSeizure

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: