मुंबई, २ जुलै २०२५: नाशिक जिल्ह्यातील माजी आमदार अपूर्व हिरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल उर्फ सावकर मादनाईक आणि इंदापूरचे प्रवीण माने यांनी आज (बुधवारी) आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत (भाजप) अधिकृतपणे प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
या प्रवेश सोहळ्याला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सीमा हिरे, प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील, राजेश पांडे, विजय चौधरी, ज्येष्ठ नेते सुरेश हाळवणकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.
महत्त्वाचे प्रवेश:
अपूर्व हिरे (नाशिक): नाशिक शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेलेले अपूर्व हिरे हे माजी मंत्री पुष्पाताई हिरे यांचे नातू आहेत. त्यांच्यासोबत नाशिकच्या माजी नगरसेविका शीला भागवत, तुळशीराम भागवत, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरलीधर भामरे, संदीप पवार आदी अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
प्रवीण माने (इंदापूर): इंदापूर तालुक्यातील प्रवीण दशरथ माने यांच्या समवेत इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, हरणेश्वर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब चवरे, शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष राजेश जामदार, अमोल मुळे, अनिकेत इनामदार, बबनराव लावंड आदींनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
अनिल मादनाईक (शिरोळ, कोल्हापूर): स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल मादनाईक यांच्यासमवेत स्वाभिमानीचे प्रदेश कोषाध्यक्ष मिलिंद साखरपे, शैलेश आडके, सतीश हेगाणा, सलीम पेंढारी, संजय पाटील, संदीप पुजारी यांच्यासह शिरोळ तालुक्यातील (जि. कोल्हापूर) अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
या प्रवेशामुळे भाजपची संघटनात्मक ताकद आणखी वाढेल, विशेषतः नाशिक, इंदापूर आणि शिरोळ (कोल्हापूर) या भागांमध्ये पक्षाला बळकटी मिळेल अशी अपेक्षा आहे.
BJP, Political Entry, Maharashtra Politics, Ravindra Chavan, Former MLA, Nashik, Indapur, Shirol, Political News
#BJP #MaharashtraPolitics #PartySwitch #ApurvaHire #PraveenMane #AnilMadnaik #RavindraChavan #PoliticalNews #Maharashtra #Nashik #Indapur #Shirol

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: