देशाला अस्थिर करण्याच्या आणि जातीय तेढ पसरवण्याच्या कटातील ११ वी अटक
नवी दिल्ली, ११ जुलै २०२५: राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आयएसआयएस (ISIS) पुणे स्लीपर मॉड्यूल प्रकरणातील प्रमुख कट रचणारा रिझवान अली उर्फ अबू सलमा उर्फ मोला याला लखनऊ येथून अटक केली आहे.
एनआयएच्या विशेष न्यायालयाने रिझवानविरुद्ध स्थायी अजामीनपात्र वॉरंट (एनबीडब्ल्यू) जारी केले होते, कारण तो नियुक्त परदेशी दहशतवादी संघटना, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (आयएसआयएस) च्या दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यात सक्रियपणे सहभागी होता.
भारतविरोधी कटातील भूमिका:
एनआयएच्या तपासानुसार, रिझवानने दहशतवादी लपण्याची ठिकाणे शोधणे आणि त्यांची रेकी करण्यात सक्रिय भूमिका बजावली होती. तसेच, तो शस्त्रे चालवण्याचे आणि सुधारित स्फोटक उपकरणे (आयईडी) तयार करण्याचे वर्ग/प्रशिक्षण घेण्यातही सहभागी होता.
रिझवानने यापूर्वीच अटक केलेल्या आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या इतर १० आरोपींसह देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी आणि जातीय तेढ पसरवण्यासाठी अनेक दहशतवादी कृत्ये करण्याचा कट रचला होता.
या प्रकरणात अटक झालेल्या इतर स्लीपर सेल सदस्यांची नावे मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमब नसिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बडोदावाला, शामिल नाचन, अकिफ नाचन, शाहनवाज आलम, अब्दुल्ला फैयाज शेख आणि तल्हा खान अशी आहेत. एनआयएने सर्व आरोपींवर यूए (पी) कायदा, स्फोटक पदार्थ कायदा, शस्त्रास्त्र कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: