CWPRS आणि SEIAA कडून हिरवा कंदील; प्रकल्पाची लवकरच निविदा प्रक्रिया
पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती भागातून सुमारे २४.४० किलोमीटर लांबीची पवना नदी वाहत असून, तिचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महानगरपालिकेने विस्तृत नियोजन केले आहे. या प्रकल्पासाठी अनुभवी तांत्रिक सल्लागार मे. एच.सी.पी. डिझाईन ॲन्ड मॅनेजमेंट प्रा.लि. यांची नेमणूक करण्यात आली आहे. या सल्लागाराने संपूर्ण पवना नदीचा सर्व्हे करून नदीच्या पाण्याचे प्रदूषण कमी करणे आणि पूर नियंत्रणाशी संबंधित कामांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार केला आहे.
या प्रकल्पाचा हायड्रोलॉजी (Hydrology) आणि हायड्रोलिक्स (Hydraulics) अहवाल भारत सरकारच्या Central Water and Power Research Station, Pune (CWPRS) मार्फत तयार करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने १० डिसेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र शासनाकडे पर्यावरण ना हरकत दाखल्यासाठी अर्ज केला होता. महाराष्ट्र शासनाच्या State Expert Appraisal Committee 3 (SEAC-3) समितीमार्फत ०८ ऑगस्ट २०२३ रोजी याला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर SEIAA समितीमार्फत वेळोवेळी बैठका घेऊन या प्रकल्पावर चर्चा करण्यात आली. महानगरपालिकेचे आयुक्त यांनी या बैठकांमध्ये प्रकल्पाची सविस्तर माहिती सादर केली होती.
प्रकल्पाचे फायदे आणि पुढील पाऊल:
या प्रकल्पाला राज्य आणि केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झाल्यानंतर तात्काळ निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. हा पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्प नदीकाठाचे संरक्षण, नदीकाठाची होणारी झीज टाळणे, जैवविविधता वाढवणे, पक्ष्यांची घरटी आणि निवासस्थाने निर्माण करणे, जवळचे जलाशय आणि नदीतील जलचरांची वाढ करणे आणि एकंदरीत नैसर्गिक नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड शहराच्या पर्यावरणासाठी आणि नदी परिसरातील नैसर्गिक संतुलनासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, असे पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी नमूद केले आहे.
Pavana River, River Rejuvenation Project, Pimpri Chinchwad Municipal Corporation, Environmental Clearance, Water Pollution Control, Flood Management, Biodiversity, Urban Development
#PavanaRiver #PimpriChinchwad #RiverRejuvenation #EnvironmentalClearance #WaterConservation #UrbanEcology #PCMC #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: