एनडीए परिसरात भारतीय इतिहासातील वीरांची मालिका पूर्ण.
पुणे, दि. ४ जुलै २०२५: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परिसरातील त्रिशक्ती गेट येथे उभारण्यात आलेल्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
एअर मार्शल (नि.) भूषण गोखले यांनी प्रस्ताविक करताना सांगितले की, एनडीए येथे महान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा समोरच असून, बाजूला महाराजा रणजितसिंह, थोरले बाजीराव पेशवे, नरवीर तानाजी मालुसरे यांचे अश्वारूढ पुतळे आहेत. हे पुतळे येथील प्रशिक्षणार्थी कॅडेट्सना प्रेरणा देतात. बाजीराव पेशव्यांनी त्यांच्या जीवनकाळात सर्व युद्धे जिंकली. त्यामुळे हा पुतळा येथे उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले की, हे स्मारक पराक्रमाचे, पराक्रमातून निर्माण होणाऱ्या प्रतिरोधाचे स्मारक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी भारतीय इतिहासात पराक्रम गाजविला आहे. भारतीय भाषाच नव्हे तर जगातील भाषांत हा इतिहास पुढे आणला पाहिजे, असेही ते म्हणाले.
Local News, History, Defense, Inauguration
#NDA #BajiraoPeshwaStatue #PuneEvents #HistoricalMonuments #IndianArmy

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: