हडपसर, खडकीत ७.८८ लाखांचा अफूच्या बोंडांचा चुरा आणि गांजा जप्त

 


 पुणे, १२ जुलै २०२५: पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक ने १२ जुलै २०२५ रोजी हडपसर आणि खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत ,८८,१००/- रुपये किमतीचे अफूच्या बोंडांचा चुरा (दोडाचुरा), पॉपीस्ट्रॉ आणि गांजा अंमली पदार्थ जप्त केले.  या कारवाईत एकूण आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.  

वरिष्ठांच्या आदेशान्वये अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवत असताना, अंमली पदार्थ विरोधी पथक  हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी अंमलदार प्रफुल्ल मोरे यांना मिळालेल्या बातमीनुसार, मांजरी रोड चौक इंद्रप्रस्थ कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, मांजरी, पुणे येथे राकेश अर्जुनदास रामावत (वय ४१ वर्षे, रा. खेडकरमळा पांगारे वस्ती, उरुळी कांचन, पुणे, मूळ गाव तहसिल पलाना, जिल्हा बिकानेर, राज्य राजस्थान) आणि ताराचंद सिताराम जहांगिर (वय २६ वर्षे, रा. खेडकरमळा पांगारे वस्ती, उरुळी कांचन, पुणे, मूळ गाव तहसिल खिंवसर, जिल्हा नागोर, राज्य राजस्थान) यांच्या ताब्यातून ,१५,५००/- रुपये किमतीचा किलो ५६० ग्रॅम अफूच्या बोंडांचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ आणि इतर ऐवज जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गु..नं. ६५२/२०२५, एन.डी.पी.एस.  ॲक्ट कलम (), २२(), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.  

तसेच, खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना,  मिळालेल्या बातमीनुसार, जोग सेंटर समोर, जुना मुंबई पुणे हायवे, वाकडेवाडी, पुणे येथे भागवत शिवाजी मंडलीक (वय २६ वर्षे, रा. विमल गार्डन जवळ, कृष्णाई कॉलनी, रामनगर रहाटणी, पुणे), मुसीम सलीम शेख (वय २४ वर्षे, रा. मदिना मशीद जवळ, ता. शिरूर कासार, जि. बीड) आणि महेश नारायण कळसे (वय २४ वर्षे, रा. सिध्देश्वर मंदिराजवळ, ता. शिरूर कासार, जि. बीड) यांच्या ताब्यातून ,७२,६००/- रुपये किमतीचा २१ किलो ८६० ग्रॅम गांजा अंमली पदार्थ आणि इतर ऐवज जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध खडकी पोलीस स्टेशनमध्ये गु..नं. /२०२५, एन.डी.पी.एस.  ॲक्ट कलम (), २०()()(), २८ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.  

ही कारवाई निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा.निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड, अंमलदार प्रफुल्ल मोरे, नितीन जगदाळे, योगेश मांढर, संदिप जाधव, उदय राक्षे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, मयुर सुर्यवंशी, साहिल शेख, रविंद्र रोकडे, आझाद पाटील, शेखर खराडे, दिशा खेवलकर यांनी केली आहे.  

Narcotics Seizure, Drug Bust, Pune Police, Anti-Narcotics Cell, Crime Prevention  

#PunePolice #DrugBust #Narcotics #CrimeNews #AntiNarcotics



हडपसर, खडकीत ७.८८ लाखांचा अफूच्या बोंडांचा चुरा आणि गांजा जप्त हडपसर, खडकीत ७.८८ लाखांचा अफूच्या बोंडांचा चुरा आणि गांजा जप्त Reviewed by ANN news network on ७/१३/२०२५ ०१:५४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".