पुणे, १५ जुलै: मांजरी खुर्द येथील कॅनरा बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका विधीसंघर्षित बालकाला गुन्हे शाखा युनिट ६ ने २४ तासांत ताब्यात घेतले आहे. वाघोली पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३
जुलै २०२५ रोजी
अज्ञात व्यक्तींनी कॅनरा
बँकेचे शटरचे कुलूप
तोडून बँकेतील तिजोरी
फोडण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात
घेऊन गुन्हे शाखा
युनिट ६ च्या
पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे
तपास सुरू केला.
तपासामध्ये आरोपी
अभिलेखावरील विधीसंघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर युनिट
६ चे पोलीस
अंमलदार अमोल सुतकर यांना
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे,
स्मशानभूमी, मांजरी खुर्द येथे
सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या विधीसंघर्षित बालकाने हा
गुन्हा त्याच्या दोन
साथीदारांसोबत
केल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून घरफोडीसाठी वापरलेले लोखंडी
कटावणी, मोठी लोखंडी
कैची, लोखंडी कानस
आणि मार्बल कटर
मशीन असे साहित्य जप्त
केले आहे.
Crime, Bank Robbery Attempt, Juvenile Crime, Police Action
#PuneCrime
#BankRobbery #JuvenileCrime #PunePolice #Manjari

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: