पुणे, १५ जुलै: कोंढवा पोलीस
ठाण्याच्या हद्दीत एका तरुणावर धारदार
हत्यारांनी हल्ला करून खुनाचा
प्रयत्न करणाऱ्या आणि परिसरात दहशत
माजवणाऱ्या सात सराईत गुन्हेगारां अटक करत दोन
विधीसंघर्षित बालकांना पोलिसांनी १२ तासांत ताब्यात घेतले आहे.
११
जुलै २०२५ रोजी
रात्री १०:००
वाजण्याच्या सुमारास गोकुळनगर चौक, एस.बी.आय. बँकेसमोर ही
घटना घडली होती.
पूर्व वैमनस्यातून आरोपींनी फिर्यादीवर हल्ला
केला होता. आरोपींमध्ये राजू उर्फ राजा
संगप्पा गुळकर (१८), तन्वीर
अक्रम शेख (१९),
सुरेंद्र उर्फ अमर भुवनेश्वर साव
(१९), कैलास बाबुराव गायकवाड (२२),
कविराज (पूर्ण नाव-पत्ता नाही) आणि
दोन विधीसंघर्षित बालकांचा समावेश
आहे. या गुन्ह्यानंतर आरोपी
साळवे गार्डनच्या मागील
बाजूला असलेल्या एका
पडीक खोलीत लपून
बसले होते.
वरिष्ठ पोलीस
निरीक्षक विनय पाटणकर यांच्या सूचनेनुसार, सहायक
पोलीस निरीक्षक राकेश
जाधव यांच्या नेतृत्वाखालील तपास
पथकाने चार पथके
तयार करून आरोपींना घेराव
घातला आणि त्यांना ताब्यात घेतले.
आरोपींना अटक
करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना १६
जुलै २०२५ पर्यंत
पोलीस कोठडी सुनावली आहे.
Crime, Attempted Murder, Gang War, Police Arrests
#PuneCrime #Kondhwa #AttemptedMurder #PunePolice #Gokulnagar

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: