तलवारीने केक कापून दहशत पसरवणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई

 


मीरा-भाईंदर :  मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा कक्ष-, विरार, यांनी तलवारीने वाढदिवसाचा केक कापून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या दोन इसमांवर कारवाई केली आहे.  

 सोशल मीडियावर काही दिवसांपासून असे फोटो व्हायरल होत होते, ज्यात काही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररीत्या जमा होऊन वाढदिवस साजरा करत होते आणि वाढदिवसाचा केक तलवारीने कापून परिसरात दहशत पसरवत असल्याचे दिसून येत होते.  याची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.  

 त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमधील व्यक्तींची माहिती काढली असता, ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील विरेंद्र बटेश्वरनाथ दुबे (वय ४२) आणि विकास शामसुंदर चौबे (वय ३९) असल्याचे समजले.  पोलिसांनी तात्काळ या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक तलवार जप्त केली आहे.  

या दोघांविरुद्ध आचोळे पोलीस ठाण्यात ११ जुलै २०२५ रोजी दुपारी :३६ वाजता गुन्हा रजि. क्र.  ३०१/२०२५ अन्वये, भारतीय न्याय संहिता कलम १८९(), (), (), १९० सह भारतीय हत्यार कायदा कलम , २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  अटक केलेल्या आरोपींना पुढील कारवाईसाठी आचोळे पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.  त्यांच्या पूर्वेतिहास तपासला असता, त्यांच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.  

ही कामगिरी आयुक्त, निकेत कौशिक, अपर  आयुक्त, दत्तात्रय शिंदे, उप आयुक्त (गुन्हे), संदीप डोईफोडे, आणि सहाय्यक आयुक्त (गुन्हे) मीरा-भाईंदर, वसई-विरार, मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शाहुराज रणवरे, हवालदार मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, सुनील पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, आणि इतर कर्मचाऱ्यांनी  पार पाडली.  

Crime, Virar News, Police Action, Public Nuisance, Weapons 

 #VirarPolice #SwordArrest #CrimeNews #PublicSafety #MaharashtraPolice #SocialMediaCrime #AcholePolice


तलवारीने केक कापून दहशत पसरवणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई तलवारीने केक कापून दहशत पसरवणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई Reviewed by ANN news network on ७/१५/२०२५ ०८:३१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".