ए एन एन न्यूज नेटवर्क बातमीपत्र
दिनांक ०६ जून २०२५
आजच्या ठळक बातम्या
पुणे आयकर विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप करत लोकजनशक्ती रामविलास पक्षाचे आंदोलन
पुणे
आयकर विभागात अधिकाऱ्यांवर करचुकवेगिरी करणाऱ्यांशी संगनमत
केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला
आहे. लोकजनशक्ती रामविलास पक्षाने पुणे
आयकर विभागासमोर आंदोलन
करत, अधिकारी मोहित
जैन, पियुषकुमार सिंग
यादव आणि आनंद
उपाध्याय यांच्यावर निष्क्रियता आणि भ्रष्टाचाराचा ठपका
ठेवला आहे. या
अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि
केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री
चिराग पासवान यांना
निवेदन पाठवून करण्यात आली
आहे.
नवीन भोसरी रुग्णालयातून गंभीर रुग्णांना खाजगी रुग्णालयात पाठवल्याचा आरोप
पिंपरी-चिंचवड येथील नवीन भोसरी रुग्णालयात गंभीर रुग्णांवर उपचार न करता खाजगी रुग्णालयात पाठवले जात असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे शहर सचिव सचिन काळभोर यांनी केला आहे. काळभोर यांनी रुग्णालयातील डॉक्टरांचा खाजगी रुग्णालयांशी आर्थिक संबंध असल्याचा संशय व्यक्त केला आहे. महापालिका आयुक्तांकडे चौकशी आणि कारवाईची मागणी करत, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
आर्थर रोड कारागृहाच्या पुनर्विकासाचे निर्देश
गृहमंत्री योगेश
कदम यांनी आर्थर
रोड कारागृहाच्या पुनर्विकासासाठी निर्देश दिले
आहेत. यात पुरुष,
महिला, तृतीयपंथी आणि
विचाराधीन कैद्यांसाठी स्वतंत्र सेल, तसेच कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने असावीत.
बहुमजली आणि पर्यावरणपूरक कारागृहासाठी 'ग्रीन
एनर्जी'चा वापर
करून एफएसआय नियमांमध्ये शिथिलता आणण्यासाठी मुंबई
महानगरपालिकेने
प्रस्ताव सादर करावा, असेही
त्यांनी सुचवले आहे. जगभरातील अशा
कारागृहांचा अभ्यास करून सुरक्षा उपाययोजनांसह सविस्तर प्रस्ताव तयार
करण्याच्या सूचनाही कदम यांनी दिल्या
आहेत.
उरणमध्ये सर्पदंशाने ७७ वर्षीय वृद्धेचा मृत्यू
उरण
तालुक्यातील सारडे गावात ७७
वर्षीय महादूबाई महादेव
माळी यांचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू
झाला आहे. वीजपुरवठा खंडित
झाल्यावर त्या बुधवारी सायंकाळी घराबाहेर पडल्या
असता त्यांना
सर्पाने दंश केला.. कुटुंबीयांनी
त्यांना तातडीने रुग्णालयात नेले,
मात्र उपचाराला उशीर
झाल्याने वाटेतच त्यांचा मृत्यू
झाला. पावसाळ्यात सर्पदंशाचे प्रमाण
वाढत असल्याने वन्यजीव आणि
निसर्ग संरक्षण संस्थेने नागरिकांना, विशेषतः शेतकऱ्यांना, रात्री
टॉर्च वापरणे, बूट
घालणे आणि त्वरित
सरकारी रुग्णालयात उपचार
घेण्याचे आवाहन केले आहे.
पुणे महापालिकेने फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील अनधिकृत दुकाने हटवली
पुणे
महानगरपालिकेने
फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील अंतिम
भूखंड क्रमांक ६१४
ब येथील सुमारे
१२ हजार ५०० चौरस
फुटांचे अनधिकृत बांधकाम हटवण्याची कारवाई केली आहे.
ही कारवाई बांधकाम विकास
विभाग झोन ६
अंतर्गत शहर अभियंता राजेश
बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पिंपळे निलख येथे पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण मोहीम
जागतिक
पर्यावरण दिनानिमित्त पिंपळे निलख येथे
आम आदमी पार्टीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेशी (PCMC) सहकार्य करून
"वृक्ष
रूपी हिरवी ओळख"
या संकल्पनेखाली वृक्षारोपण मोहीम
राबवली. पीसीएमसीच्या उद्यान
विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे
यांच्यासह अनेक अधिकारी आणि
रहिवाशांनी यात सक्रिय सहभाग
घेतला. परिसराला प्रदूषणमुक्त आणि
हिरवेगार करण्यासाठी स्थानिक झाडे लावण्याचा संकल्प
सहभागींनी केला.
पिंपरी-चिंचवडमधील नागरी समस्यांवर आमदारांची आयुक्तांशी चर्चा
आमदार
शंकर जगताप यांनी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त
शेखर सिंह आणि
विविध विभागांच्या वरिष्ठ
अधिकाऱ्यांसोबत
शहरातील नागरी समस्यांवर बैठक
घेतली. मोरया गोसावी
मंदिरासमोरील दगडी रस्ता आणि
पार्किंगची देखभाल, पावसाळ्यापूर्वी ताथवडे,
पुनावळे आणि वाकड येथील
सेवा रस्त्याजवळील गटार
आणि नाले साफसफाई, तसेच
रस्ते आणि पुलांशी संबंधित मुद्द्यांवर या
बैठकीत चर्चा झाली.
तातडीने उपाययोजना राबवण्याचे निर्देश आमदार जगताप यांनी
दिले.
या
होत्या आजच्या काही
महत्त्वाच्या घडामोडी. अधिक बातम्या आणि
विश्लेषणासाठी
पहात रहा अस्त्र न्यूज नेटवर्क डॊट कॊम.
#MarathiNews #DailyNews #MaharashtraNews #Pune #PimpriChinchwad #Corruption #PublicHealth #JailRedevelopment #Snakebite #CivicAction #Environment #LocalNews #AakashwaniNews #IndiaNews
Reviewed by ANN news network
on
६/०६/२०२५ १२:५६:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: