पिंपरी, दि. ५ जून २०२५: पिंपरी-चिंचवड शहरातील विविध नागरी समस्या, विकास प्रकल्प, वाहतूक व्यवस्था आणि पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर आज आमदार शंकर जगताप आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्यात विस्तृत चर्चा झाली. या बैठकीला महापालिकेच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीस सहआयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उपायुक्त मनोज लोणकर, पाणीपुरवठा व स्थापत्य विभागाचे प्रमुख अभियंता प्रमोद ओंबासे, सहशहर अभियंता देवअण्णा गट्टूवार व बापू गायकवाड, नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड, पर्यावरण विभागाचे प्रमुख अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहशहर अभियंता मनोज शेटीया आणि स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांच्यासह संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.
बैठकीतील प्रमुख चर्चेचे मुद्दे:
- धार्मिक स्थळ आणि सुविधा: मोरया गोसावी मंदिरासमोरील दगडी रस्ता आणि पार्किंगची देखभाल व दुरुस्ती.
- पावसाळ्याची तयारी: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने केलेल्या पत्रव्यवहारानुसार, ताथवडे, पुनावळे, वाकड परिसरातील सर्विस रस्त्याजवळील नाले, कलव्हर्ट इत्यादी मोकळे व स्वच्छ करण्याबाबत, तसेच पावसाळ्यात अंडरपास खाली जमणारे पाण्याचा निचरा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत.
- रिलायन्स केबल्स: रिलायन्स कंपनीतर्फे दुरुस्तीच्या नावाखाली शहरातील फुटपाथ व इतर ठिकाणी टाकण्यात आलेल्या केबल्समुळे महानगरपालिकेचे कोट्यवधी रुपयांचे झालेल्या नुकसानाची चौकशी संदर्भात कारवाई.
- शिक्षक मागण्या: महापालिका शिक्षकांच्या विविध मागण्या.
- रस्ते आणि पूल: कल्पतरू पिंपळे गुरव, पी.के चौक पिंपळे सौदागर, काळेवाडी अंडरपास व एमएम चौक पूल संदर्भातील प्रश्न.
- वाहतूक सुधारणा: काळेवाडी चौकातील शिवसृष्टी ट्राफिक आयलंडचे काम सुरू करण्याचे नियोजन, काळेवाडी एमएम चौक येथे ग्रेड सेपरेटर करणे, आणि काळेवाडीत 'लेफ्ट फ्री' मार्गांची अंमलबजावणी.
- जागेचा वापर: वृक्षारोपणासाठी 'प्राईड पर्पल'ला देण्यात आलेली जागा भाडेपट्टा करार रद्द करून ताब्यात घेणे.
- शहरी विकास: पशुसंवर्धन जागेत पार्क आणि रिव्हर फ्रंट रिझर्वेशन योजनेबाबत प्रगती, पुनावळे येथे ऑक्सिजन पार्कची निर्मिती.
- पाण्याची सोय: नवविकसित गावांमध्ये पाण्याच्या टाक्यांसाठी आरक्षणाची पुनर्तपासणी.
- भूमकर चौक: भूमकर चौकात प्रत्यक्ष पाहणी करून पुन्हा आढावा घेण्याचा निर्णय; ड्रेनेज लाईन टाकून दिल्यास वाहतूक समस्या सुटण्यास मदत होईल.
- मेट्रो संबंधित कामे: मेट्रो प्रकल्पासाठी काळा खडक येथील जुना जकात नाका ते वाकड पोलीस चौकी पर्यंत रस्ते काम आणि अतिक्रमण हटवण्याची सूचना.
- रस्ते कामाची गती: ताथवडे-पुनावळे रस्त्याच्या कामाची गती वाढवणे.
- प्रारूप विकास आराखडा: प्रारूप विकास आराखड्याचे मराठीत भाषांतर करण्याची मागणी.
- एसटीपी कनेक्शन: एसटीपी कनेक्शन रद्द केल्यामुळे सोसायट्यांमध्ये निर्माण झालेला गोंधळ.
- स्मशानभूमी: वाल्हेकरवाडी स्मशानभूमीच्या 'मेरी' या संस्थेच्या सर्वेक्षण अहवालानुसार कामाचा आढावा.
या बैठकीत नागरी समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार शंकर जगताप यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचना लवकरात लवकर प्रत्यक्षात आणण्याचा आग्रह धरला. तसेच नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने बैठका घेण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.
#PimpriChinchwad #UrbanIssues #DevelopmentProjects #TrafficManagement #PMC #ShankarJagtap #ShekharSingh #Pune #Infrastructure #CitizenConcerns
Reviewed by ANN news network
on
६/०५/२०२५ ११:३६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: