कामगार नेता श्याम म्हात्रे यांच्या पुण्यस्मरणार्थ महिलांसाठी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरे

 


उरण: काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते श्याम पदाजी म्हात्रे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त ९ जून रोजी पनवेल येथे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आगरी शिक्षण संस्था, सेक्टर ६, खांदा कॉलनी, पनवेल येथे सकाळी १० वाजता या कार्यक्रमांना सुरुवात होईल. दिवंगत श्याम म्हात्रे यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांची कन्या आणि कामगार नेत्या श्रुती श्याम म्हात्रे यांनी केले आहे.

श्रुती म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुण्यस्मरण सोहळ्यात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, कर्करोगाविषयी जनजागृती व्याख्यान आणि झुंझुनवाला आय हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील बेलपाडा गावात जन्मलेल्या श्याम म्हात्रे यांचा राजकीय प्रवास अतिशय संघर्षमय राहिला. कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ आपल्या अमोघ वाणीने, प्रचंड इच्छाशक्ती आणि जनसंपर्काच्या बळावर त्यांनी राजकारणात सर्वोच्च स्थान निर्माण केले होते. काँग्रेस पक्षाची बुलंद तोफ म्हणून ओळखले जाणारे म्हात्रे साहेब वर्षानुवर्षे पक्षाची धुरा खांद्यावर घेऊन अनेक पदे भूषवली होती. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक लढे दिले, यासाठी त्यांना अनेकदा पोलिसांच्या पिंजऱ्यातही बसावे लागले. काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी आणि पक्ष बळकट करण्यासाठी त्यांनी उरण विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. गरीब, कष्टकरी, प्रकल्पग्रस्त आणि कामगारांच्या न्याय हक्कासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांची कन्या श्रुती श्याम म्हात्रे यांनी ही जबाबदारी स्वीकारली असून, आजही त्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलने आणि मोर्चे काढताना दिसत आहेत. सात वर्षे होऊनही म्हात्रे साहेब त्यांच्या आठवणीतून काही सरत नाहीत आणि आजही त्या भावुक होताना दिसतात. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठीच हा सातवा पुण्यस्मरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

  • -------------------------------------------------------------------------------------------------------------------Public Event, Memorial, Social Programs, Panvel, Congress Party, Labor Leader, Maharashtra
  •  #ShyamMhatre, #Punyatithi, #Panvel, #SocialWork, #Congress, #LaborLeader, #MaharashtraPolitics
कामगार नेता श्याम म्हात्रे यांच्या पुण्यस्मरणार्थ महिलांसाठी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरे कामगार नेता श्याम म्हात्रे यांच्या पुण्यस्मरणार्थ महिलांसाठी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरे Reviewed by ANN news network on ६/०८/२०२५ ०५:०९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".