मुंबई - विनोबा भावे नगर, कुर्ला पोलिसांनी मोटार वाहन चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून तीन चोरीच्या वाहनांसह एकूण १,७०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे तीन गुन्हे उकलण्यात आले आहेत.
२८ मे २०२५ रोजी दिपक कुमार छेदीलाल साहू (वय २२) या रिक्षाचालकाची अॅटोरिक्षा कुर्ला पश्चिम येथून चोरीला गेली होती. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक कौशल्य आणि गोपनीय माहितीच्या आधारे मोहम्मद सगीर अब्दुल मजीद सिद्दिकी उर्फ मॅगी (वय २७) या सराईत आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून चोरीला गेलेली अॅटोरिक्षा हस्तगत करण्यात आली. तसेच अधिक तपासणीत त्याच्याकडे असलेल्या दोन मोटारसायकलीही जप्त करण्यात आल्या. आरोपी हा मोटार वाहन चोरीच्या अनेक गुन्ह्यांत सामील असल्याचे तपासात दिसून आले आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------
#MumbaiPolice #CrimeNews #CyberCrime #DigitalArrest #PonziScheme #TheftArrest #SecurityAlert #LawEnforcement #FraudPrevention #PoliceAction #Maharashtra #ThanePolice #Investigation #CrimeBusters #PublicSafety
Reviewed by ANN news network
on
६/०६/२०२५ ०३:१४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: