मुंबई - मुंबई पोलिसांनी 'डिजिटल अरेस्ट' सायबर फसवणुकीच्या एका मोठ्या प्रकरणात १.२९ कोटी रुपये वाचवण्यात यश मिळवले आहे. विलेपार्ले येथील एका ७३ वर्षीय डॉक्टरची २.८९ कोटी रुपयांची फसवणूक झाली होती, त्यापैकी ही मोठी रक्कम तात्काळ गोठवण्यात आली.
४ जून रोजी डॉक्टरांनी १९३० सायबर हेल्पलाईनवर तक्रार दिली की, अज्ञात व्यक्तींनी त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे TRAI चे अधिकारी, पोलीस आणि न्यायाधीश असल्याचे भासवले होते. त्यांनी डॉक्टरांच्या बँक खात्यावरील अनियमित व्यवहारांबद्दल सांगून 'नरेश गोयल केस'मध्ये त्यांचे नाव आल्याचे कारण देत 'डिजिटल अरेस्ट' करण्याची धमकी दिली होती.
२ आणि ४ जून रोजी पाच वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनद्वारे २.८९ कोटी रुपये विविध बँक खात्यांवर ट्रान्सफर करण्यास भाग पाडले होते. १९३० हेल्पलाईन पथकाने तात्काळ NCRP पोर्टलवर तक्रार दाखल करून संबंधित बँकांशी संपर्क साधला. त्यामुळे १.२९ कोटी रुपये 'होल्ड' करून वाचवण्यात यश आले.
पोलिसांनी नागरिकांना सावध केले आहे की, 'डिजिटल अरेस्ट' ही केवळ मानसिक दबावाची पद्धत आहे आणि ती कायदेशीर नाही. कोणतीही कायदेशीर अटक लेखी नोटीस आणि वॉरंटद्वारेच केली जाते.
-------------------------------------------------------------------------------------------
#MumbaiPolice #CrimeNews #CyberCrime #DigitalArrest #PonziScheme #TheftArrest #SecurityAlert #LawEnforcement #FraudPrevention #PoliceAction #Maharashtra #ThanePolice #Investigation #CrimeBusters #PublicSafety
Reviewed by ANN news network
on
६/०६/२०२५ ०३:१३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: