मुंबई - भारतात अनाधिकृतपणे प्रवेश करून बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांना मुंबईतील न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. प्रत्येकाला पाच महिने साधी कैद आणि २०,००० रुपये दंड अशी शिक्षा झाली आहे.
गुन्हे प्रकटीकरण कक्ष-४ चे अधिकाऱ्यांनी २ जानेवारी २०२५ रोजी घाटकोपर पश्चिम येथे छापा घालून चांदनी ओप्पू मौडल (वय २४) आणि तस्लिमा रफिकूल मौडल (वय ४१) या दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याजवळ कोणतेही वैध कागदपत्र नव्हते.
चौकशीत त्यांनी भारतात अनाधिकृतपणे प्रवेश केल्याची कबुली दिली होती. तांत्रिक तपासामध्ये त्या बांगलादेशातील त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात असल्याचेही दिसून आले होते.
त्यांच्याविरुद्ध परकीय नागरिक कायदा १९४६ आणि पारपत्र अधिनियम १९६७ च्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने ही केस फास्ट ट्रॅकवर चालवून निकाल दिला आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------
#MumbaiPolice #CrimeNews #CyberCrime #DigitalArrest #PonziScheme #TheftArrest #SecurityAlert #LawEnforcement #FraudPrevention #PoliceAction #Maharashtra #ThanePolice #Investigation #CrimeBusters #PublicSafety
Reviewed by ANN news network
on
६/०६/२०२५ ०३:१४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: