पुणे: निगडी परिसरात काल रात्री एका व्यक्तीला जुन्या भांडणाच्या कारणातून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत सहा आरोपींना अटक केली आहे. निगडी येथील अजंठानगर परिसरातील तिरंगा हाऊसिंग सोसायटीजवळ १ जून २०२५ रोजी रात्री १०:३० वाजता जमिल पठाण यांच्यावर लोखंडी रॉड आणि लाठ्या-काठ्यांनी हल्ला करण्यात आला. या प्रकरणी निगडी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून, इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय इंद्रजित धेडे (वय ४५, रा. तिरंगा हाऊसिंग सोसायटी, अजंठानगर, निगडी) यांनी सांगितले की, त्यांचा मित्र जमिल पठाण हे एसआरए बिल्डिंगच्या ऑफिसजवळ चेक घेण्यासाठी गेले असताना, आरोपी विजय धेंडे, भैया ऊर्फ बाबासाहेब गजरमल, दत्ता गायकवाड, राहुल साळुंखे, अज्जु महाकाली, आशिफ शेख आणि त्यांच्या इतर पाच ते सहा साथीदारांनी त्यांना घेरले. विजय धेंडे याने जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून, "आज याला जिवंत सोडायचे नाही, हा माझ्याविरुद्ध पोलिसांत अर्ज करतो, याला खल्लास करू," अशी धमकी देत मारहाण सुरू केली. आरोपींनी लोखंडी रॉड आणि लाठ्या-काठ्यांनी जमिल पठाण यांना गंभीर जखमी केले.
निगडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन विजय धेंडे, भैया ऊर्फ बाबासाहेब गजरमल, दत्ता गायकवाड, राहुल साळुंखे आणि आशिफ शेख यांना अटक केली. इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम १०९, ११८(१) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमिल पठाण यांना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------- #NigdiCrime #AttemptedMurder #PunePolice #Arrested #CrimeNews
Reviewed by ANN news network
on
६/०३/२०२५ ०५:०१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: