पिंपरी-चिंचवड: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपळे निलख परिसरात "वृक्ष रुपी हिरवी ओळख" या संकल्पनेतून 'हरित क्रांती'ची प्रेरणादायी सुरुवात करण्यात आली. आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या पुढाकाराने आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या सहकार्याने हा वृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका उद्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, उद्यान अधीक्षक योगेश वाळूंज, सहायक उद्यान अधीक्षक राजेश वसावे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड, उद्यान सहाय्यक अनिल गायकवाड, तसेच पिंपळे निलख आणि विशालनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या उपक्रमात विविध प्रकारचे स्थानिक वृक्ष लावून परिसराला हिरवेगार आणि प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. नागरिकांचा सहभाग आणि सकारात्मक प्रतिसाद पाहता, हा उपक्रम भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणात राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी रविराज काळे यांनी सांगितले की, "हिरवे पर्यावरण ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावण्याचा आणि त्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प केला पाहिजे."
या उपक्रमामुळे पिंपळे निलखमध्ये एक नवे हरित पर्व सुरू झाले असून, हीच झाडे उद्याच्या हरित भविष्यासाठी आधारस्तंभ ठरणार आहेत.
#PimpleNilakh #WorldEnvironmentDay #TreePlantation #GreenRevolution #AAP #PCMC #PimpriChinchwad #EnvironmentalProtection #GoGreen #TreePlanting
Reviewed by ANN news network
on
६/०५/२०२५ ११:१९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: