अहमदाबाद विमान अपघातात न्हावा गावच्या मैथिली पाटीलचा मृत्यू; महेंद्र घरत यांनी केले कुटुंबीयांचे सांत्वन

 


उरण, दि. १३ जून २०२५:
अहमदाबादमधील विमान अपघातात पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील मैथिली मोरेश्वर पाटील हिचा मृत्यू झाल्याने न्हावा गावावर शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेनंतर काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत यांनी आज न्हावा येथे जाऊन मैथिलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

मैथिलीच्या निधनाने न्हावा गावात पसरलेली स्मशानशांतता पाहून घरत यांनाही तीव्र दुःख झाले. सांत्वन करताना ते म्हणाले, "गुरुवारी घडलेली विमान अपघाताची घटना अतिशय वेदनादायक आहे. न्हावा गावची कन्या या दुर्दैवी अपघातात निधन झाल्याचे समजताच गावात स्मशानशांतता पसरली आहे. ही घटना समजताच मी स्वतः अस्वस्थ आणि दुःखी झालो आहे."

घरत यांनी पुढे सांगितले, "काँग्रेसचा एक पूर्वनियोजित कार्यक्रम ठरला होता, पण या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच तो रद्द करण्यात आला आहे. मैथिलीच्या कुटुंबीयांच्या पाठीशी मी कायम उभा आहे."

यावेळी न्हावा गावचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे उपस्थित होते. याप्रसंगी न्हावा गावच्या माता-भगिनीही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



 Ahmedabad Plane Crash, Mathili Patil, Nhavagaon, Condolence Visit, Mahendrasheth Gharat, Raigad News

 #MathiliPatil #AhmedabadPlaneCrash #Nhavagaon #Panvel #MahendrashethGharat #RaigadNews #Condolences #TragicAccident

अहमदाबाद विमान अपघातात न्हावा गावच्या मैथिली पाटीलचा मृत्यू; महेंद्र घरत यांनी केले कुटुंबीयांचे सांत्वन अहमदाबाद विमान अपघातात न्हावा गावच्या मैथिली पाटीलचा मृत्यू; महेंद्र घरत यांनी केले कुटुंबीयांचे सांत्वन Reviewed by ANN news network on ६/१३/२०२५ ०६:५६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".