डेहराडून येथे होणाऱ्या ऑल इंडिया ओपन शूटिंग चॅम्पियनशिपसाठी राजू मुंबईकर यांची निवड

 


उरण, दि. १३ जून २०२५: नुकत्याच मुंबई येथे झालेल्या २८ व्या कॅप्टन एस. जे. इझेकिएल (एनआर) कॉम्पिटिशनमध्ये (६ ते ९ जून २०२५) 'सिद्धांत रायफल आणि पिस्टल शूटिंग क्लब, रायगड' च्या नेमबाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेतून राजू मुंबईकर (वेश्वी, उरण) यांची डेहराडून, उत्तराखंड येथे ७ जुलै रोजी होणाऱ्या 'ऑल इंडिया ओपन शूटिंग चॅम्पियनशिप'साठी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

वरळी, मुंबई येथील महाराष्ट्र रायफल संघटनेतर्फे आयोजित या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातून सिद्धांत रायफल आणि पिस्टल शूटिंग क्लबच्या ३१ नेमबाजांनी सर्वाधिक प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत अनेक नेमबाजांनी नेत्रदीपक कामगिरी करत पदके पटकावली आणि पुढील स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.

स्पर्धेतील प्रमुख कामगिरी:

  • २५ मीटर स्टँडर्ड तसेच MAFC स्पोर्ट्स पिस्टल, ५० मीटर फ्री पिस्टल: वेदांत किसन खारके (नेरे, पनवेल)
  • ५० मीटर रायफल प्रोन पुरुष: गौरव ठाकूर (चिरनेर, उरण) - कांस्य पदक
  • ५० मीटर रायफल प्रोन ज्युनिअर मेन: कुणाल पाटील (जासई, उरण) - रौप्य पदक
  • ५० मीटर रायफल मास्टर मेन: राजू मुंबईकर (वेश्वी, उरण)
  • दिग्विजय चौगुले, पार्थ तोडकर
  • ५० मीटर रायफल ज्युनिअर वुमन: वैभवी बिष्ट - रौप्य पदक
  • कार्तिकी देऊळेकर, वरा देऊळेकर
  • ५० मीटर प्रोन रायफल मेन: नंदकुमार माने (ठाणे अंमलदार, बेलापूर)
  • ५० मीटर रायफल मास्टर मेन: ५० मीटर फ्री पिस्टल शुभम पुसलकर आणि दुर्गा जाधव
  • ५० मीटर ओपन साईट रायफल: करण बेहेरे - रौप्य पदक, मयुरेश सावंत - कांस्य पदक
  • सागर वैगनकर
  • शॉट गन ट्रॅप: अवनी कोळी (दिघोडे, उरण) - रौप्य पदक
  • वरा देऊळेकर, कार्तिकी देऊळेकर - डबल ट्रॅप

या सर्व नेमबाजांची ७ जुलै रोजी डेहराडून, उत्तराखंड येथे होणाऱ्या 'इंडिया ओपन शूटिंग चॅम्पियनशिप'साठी निवड झाली आहे.

गौरव ठाकूर आणि कुणाल पाटील यांना महाराष्ट्र रायफल संघटनेच्या सेक्रेटरी शिला कानूगो  आणि अध्यक्ष अशोक पंडितयांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

सिद्धांत रायफल आणि पिस्टल शूटिंग क्लबचे सेक्रेटरी व राष्ट्रीय नेमबाज किसन खारके, प्रशिक्षक अलंकार कोळी, राल्स्टन कोयलो, क्लबचे सदस्य अजिंक्य चौधरी, समाधान घोपरकर, अविनाश केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था उरण महाराष्ट्र, रोटरी क्लब सनराईझ पनवेल, श्री साई संस्थान वहाळ, सुभाष सेठ भोपी सामाजिक संस्था रिटघर भारत भोपी भगत, प्रकाश दिसले, सुनील मढवी, समीर अंबवणे, नंदकुमार मुंबईकर तसेच मित्रपरिवार यांनी या सर्व नेमबाजांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.


Shooting Championship, Raigad, Raju Mumbaikar, All India Open, Sports News, Urn

 #Shooting #AllIndiaOpen #RajuMumbaikar #Raigad #Uran #SportsNews #Dehradun #MaharashtraRifleAssociation

डेहराडून येथे होणाऱ्या ऑल इंडिया ओपन शूटिंग चॅम्पियनशिपसाठी राजू मुंबईकर यांची निवड डेहराडून येथे होणाऱ्या ऑल इंडिया ओपन शूटिंग चॅम्पियनशिपसाठी राजू मुंबईकर यांची निवड Reviewed by ANN news network on ६/१३/२०२५ ०७:१४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".