उत्तरप्रदेशातील सराईत गुन्हेगार पुण्यात जेरबंद
पुणे : पुणे शहरातील समर्थ पोलिसांनी एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. ही कारवाई रास्ता पेठ येथील राज रेस्टॉरंटसमोरील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, ५ जून २०२५ रोजी रात्री ८:०५ वाजण्याच्या सुमारास एका फिर्यादीने राज रेस्टॉरंटसमोरील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, मशीनमधून पैसे बाहेर आले नाहीत त्यामुळे त्यांची फसवणूक झाल्याने त्यांनी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.
वरिष्ठांच्या आदेशानुसार, समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला.
या आरोपींनी ५ जून २०२५ रोजी एटीएम मशीनमधून पैसे निघण्याच्या ठिकाणी एक काळी पट्टी लावली होती आणि आज ते ती पट्टी काढून त्यात अडकलेले पैसे घेण्यासाठी आले असल्याचे कबूल केले. त्यांच्याकडे अधिक माहिती काढली असता, त्यांच्यावर यापूर्वी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली.
तपासात त्यांनी वरीलप्रमाणे गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून रोख रक्कम, वेगवेगळ्या बँकांचे ४ एटीएम कार्ड आणि एटीएम मशीनच्या कॅश शटरला लावलेली काळ्या रंगाची पट्टी जप्त करण्यात आली आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
Crime, ATM Fraud, Arrest, Pune Police, Samarth Police Station
#PuneCrime #ATMfraud #SamarthPolice #Arrested #CyberCrime #PunePolice #Fraudsters
Reviewed by ANN news network
on
६/०९/२०२५ ०६:३५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: