मुंबई - मुंबई पोलिसांनी दिल्लीतील एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करून क्रेडिट कार्डच्या मर्यादा वाढवण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा प्रमुख मनजीत कुमार महावीर सिंग याला अटक केली आहे. या कारवाईत ४,१७,५१७ रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
२८ ऑगस्ट २०२४ रोजी एका नागरिकाला अॅक्सिस बँकेचे कर्मचारी असल्याचे भासवणाऱ्या फसव्याने फोन करून त्यांच्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्याचे आमिष दाखवले होते. त्यानंतर संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांच्या कार्डमधून ४,५४,७१७ रुपये काढून घेण्यात आले होते.
शीव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक तपासामध्ये आरोपी दिल्लीतील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सायबर सेलचे पथक दिल्लीला रवाना झाले. तेथे 'इंटरनेटी इंटेलेक्शन कॉल सेंटर'मध्ये अनधिकृत कॉल सेंटर चालवणाऱ्या मुख्य आरोपी मनजीत कुमारला अटक करण्यात आली.
आरोपींकडून आठ मोबाईल फोन आणि आठ सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत. या गुन्ह्याशी संबंधित महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही १६ हून अधिक तक्रारी दाखल असल्याचे दिसून आले आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------
#MumbaiPolice #CrimeNews #CyberCrime #DigitalArrest #PonziScheme #TheftArrest #SecurityAlert #LawEnforcement #FraudPrevention #PoliceAction #Maharashtra #ThanePolice #Investigation #CrimeBusters #PublicSafety
Reviewed by ANN news network
on
६/०६/२०२५ ०३:१५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: