मुंबई - वडाळा पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान मंदिरातील चोरीच्या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना पकडण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत चोरीला गेलेली दानपेटी आणि चांदीचा मुकुट हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून ३ जून रोजी पहाटे १:३० ते ३:३० दरम्यान गोदरेज जंक्शन येथे नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी बीट मार्शल सागर पवार यांनी संशयास्पद टॅक्सीची तपासणी केली असता, त्यात दोन व्यक्तींच्या ताब्यात स्टीलची दानपेटी आणि चांदीचा मुकुट आढळला.
सखोल चौकशीत आरोपी रफीउल्ला एहसान उल्ला खान (वय २६) आणि राजू लक्ष्मण कांबळे (वय २१) यांनी भुलाबाई देसाई रोडवरील शनिमंदिर व स्वामीनारायण मंदिराच्या शेजारी असलेल्या मंदिरातून ही वस्तू चोरल्याची कबुली दिली आहे. दोन्ही आरोपी अँटॉपहिल परिसरातील रहिवासी आहेत.
गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कामगिरीबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस उप आयुक्त, बंदर परिमंडळ यांनी प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरव केला आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
#MumbaiPolice #CrimeNews #CyberCrime #DigitalArrest #PonziScheme #TheftArrest #SecurityAlert #LawEnforcement #FraudPrevention #PoliceAction #Maharashtra #ThanePolice #Investigation #CrimeBusters #PublicSafety
Reviewed by ANN news network
on
६/०६/२०२५ ०३:१५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: