बकरी ईदसाठी पुणे वाहतूक पोलिसांचे मोठे बदल; गोळीबार मैदान चौक परिसर राहणार नो-एंट्री

 


पुणे: ७ जून २०२५ रोजी पुणे शहरात साजरी होणाऱ्या बकरी ईदनिमित्त, गोळीबार मैदान चौक येथील ईदगाह मैदानावर होणाऱ्या सामूहिक नमाज पठणामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पुणे शहर वाहतूक पोलिसांनी सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीसाठी विशेष व्यवस्था केली आहे.

डॉ. संदीप भाजीभाकरे, पोलीस उप आयुक्त, मुख्यालय पुणे शहर (अति. कार्यभार वाहतूक पुणे शहर) यांनी मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून हे आदेश निर्गमित केले आहेत. दि. ०७/०६/२०२५ रोजी सकाळी ०६:०० वाजेपासून नमाज पठण पूर्ण होईपर्यंत गोळीबार मैदान चौक परिसरात वाहतूक वळविण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इ.) यातून वगळण्यात आले आहे.

वाहतुकीतील प्रमुख बदल:

  1. भैरोबानाला ते गोळीबारकडे जाणारी वाहतूक: सकाळी ०६:०० ते ११:३० वाजेपर्यंत बंद राहील.
    • पर्यायी मार्ग: स्वारगेटकडे जाणारी जड वाहने (फक्त मार्केट यार्डसाठी) प्रिन्स ऑफ वेल्स रोडने लुल्लानगर चौक मार्गे जातील. पुणे स्टेशनकडे जाणारी हलकी वाहने इम्प्रेस गार्डन रोड मार्गे जातील.
  2. मम्मादेवी चौकातून गोळीबार मैदान चौकाकडे जाणारी वाहतूक: बंद राहील.
    • पर्यायी मार्ग: मम्मादेवी चौक बिशप स्कुल मार्गे किंवा कमांड हॉस्पीटल मार्गे इच्छितस्थळी किंवा नेपीअर रोडने पुढे सीडीओ चौकातून इच्छितस्थळी जातील.
  3. सीडीओ चौकातून गोळीबार चौकाकडे येणारी वाहतूक: नमाज पठण काळात सकाळी ०६:०० ते ११:३० वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहील.
    • पर्यायी मार्ग: लुल्लानगरकडून येणारी वाहने सीडीओ चौकातून डावीकडे वळुन इच्छित स्थळी जातील. खटाव बंगला चौकातून उजवीकडे वळुन नेपीयर रोडने मम्मादेवी चौकातून सरळ बिशप स्कुल मार्गे जातील.
  4. सेव्हन लव्हज चौकाकडून गोळीबार मैदानकडे येणारी वाहतूक: बंद राहील.
    • पर्यायी मार्ग: सदरची वाहने सॅलसबरी पार्क सीडीओ चौक - भैरोबानाला येथून इच्छित स्थळी जातील.
  5. जुनी सोलापूर बाजार चौकी चौक ते गोळीबार चौक दरम्यानची वाहतूक: बंद राहील.
    • पर्यायी मार्ग: खाणे मारुती चौकाकडून येणारी वाहने पुलगेट डेपो, सोलापूर बाजार चौक सरळ नेपीयर रोडने, खटाव बंगला मार्गे किंवा मम्मादेवी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
  6. लुल्लानगर चौकातून गोळीबारकडे येणारी सर्व जड माल वाहतूक वाहने, प्रवासी वाहतूक करणारी जड वाहने, एसटी बसेस, पीएमपीएमएल बसेस: यांना मनाई करण्यात येत आहे.
    • पर्यायी मार्ग: सदर वाहनांनी लुल्लानगर चौकातून भैरोबानाला चौक किंवा गंगाधाम चौकातून इच्छित स्थळी जातील.

याव्यतिरिक्त, शहरातील अन्य भागातील ईदगाह मैदानांवर नमाज पठण होत असते, तेथील वाहतुकीच्या परिस्थितीनुसार वाहतूक बंद अथवा अन्य मार्गाने वळविण्यात येईल. वाहन चालकांनी पोलिसांना सहकार्य करून संभाव्य गैरसोय टाळावी, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

  • ------------------------------------------------------------------------------------------------------------- #PuneTraffic, #BakriEid, #TrafficAdvisory, #RoadDiversions, #PunePolice
बकरी ईदसाठी पुणे वाहतूक पोलिसांचे मोठे बदल; गोळीबार मैदान चौक परिसर राहणार नो-एंट्री बकरी ईदसाठी पुणे वाहतूक पोलिसांचे मोठे बदल; गोळीबार मैदान चौक परिसर राहणार नो-एंट्री Reviewed by ANN news network on ६/०६/२०२५ ०३:३५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".