पिंपरी चिंचवड: चिखली येथे पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने मोठी कारवाई करत सुमारे ७.४८ लाख रुपये किंमतीचे मेफेड्रॉन (एम.डी.) ड्रग्ज जप्त केले आहे. या प्रकरणी मुंबईतील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०५/०६/२०२५ रोजी सायंकाळी ५:४५ वाजण्याच्या सुमारास रिव्हर रेसिडेन्सी फेज-३ च्या पाठीमागील कंपाऊंडच्या भिंतीलगत, जाधववाडी, चिखली, पुणे येथे ही कारवाई करण्यात आली. प्रमोद रोहिदास गर्जे (वय ३६ वर्षे, पोलीस शिपाई १७९१, गुन्हे शाखा, युनिट १, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय) यांनी फिर्याद दिली आहे.
अमीर अली असगर अली सिद्दिकी (वय ३२ वर्षे, रा. जलाराम पार्क, बी विंग १००३, सोनापूर, भांडुप (पश्चिम), मुंबई) या आरोपीच्या ताब्यात ७,४८,९००/- रुपये किंमतीचा ७४.८९० ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, तसेच १०,०००/- रुपये किंमतीचा ०१ मोबाईल असा एकूण ७,५८,९००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल अनाधिकाराने व बेकायदेशीररित्या विक्रीसाठी बाळगताना मिळून आला. आरोपीने सदरचा मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ परवेज हसिन खान (रा. मरोळ नाका, अंधेरी, मुंबई) याच्याकडून विक्रीसाठी विकत घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अमीर अली असगर अली सिद्दिकी याला अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड (गुन्हे शाखा युनिट १, पिंपरी चिंचवड) पुढील तपास करत आहेत.
- ------------------------------------------------------------------------------------------------------ #DrugSeizure, #MDDrugs, #PimpriChinchwad, #Chikhali, #Narcotics, #Arrest
Reviewed by ANN news network
on
६/०६/२०२५ ०४:२८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: