मरकळ येथे हातभट्टीवर पोलिसांचा छापा; ५० हजारांच्या मुद्देमालासह एक महिला अटकेत

 


पिंपरी चिंचवड: आळंदी पोलिसांनी मरकळ परिसरात छापा टाकून बेकायदेशीर गावठी हातभट्टीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ५० हजार रुपये किंमतीचे १,००० लिटर कच्चे रसायन जप्त करण्यात आले असून, एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०५/०६/२०२५ रोजी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास मरकळ येथील मरकळ-कोयाळी रोडच्या कडेला ही कारवाई करण्यात आली. योगेश्वर औदुंबर कोळेकर (पोशि/१२८१, नेमणूक गुन्हे शाखा, युनिट ३, पिंपरी चिंचवड शहर) यांनी फिर्याद दिली आहे.

मोरंती चरणसिंग रजपुत (रा. मरकळ, ता. खेड, जि. पुणे) या महिलेने बेकायदा गावठी हातभट्टीसाठी लागणारे अंदाजे ५०,०००/- रुपये किंमतीचे १,००० लिटर कच्चे रसायन जवळ बाळगले होते. तसेच, तिने अनाधिकाराने, विनापरवाना व बेकायदेशीररित्या दारूची हातभट्टी लावली असताना आढळून आली.

या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी मोरंती चरणसिंग रजपुत हिला अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार भोंडवे पुढील तपास करत आहेत.

  • -------------------------------------------------------------------------------------------------------- #IllicitLiquor, #AlandiPolice, #Raid, #PimpriChinchwad, #Arrest
मरकळ येथे हातभट्टीवर पोलिसांचा छापा; ५० हजारांच्या मुद्देमालासह एक महिला अटकेत मरकळ येथे हातभट्टीवर पोलिसांचा छापा; ५० हजारांच्या मुद्देमालासह एक महिला अटकेत Reviewed by ANN news network on ६/०६/२०२५ ०४:२३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".