शहरातील सर्वे क्रमांक ५७९/१ब, मौजे बिबवेवाडी येथे अनधिकृतपणे डोंगरफोड करून भूखंड सपाटीकरणाचे काम सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार प्रशासनाने तातडीने ड्रोनद्वारे पाहणी करून जागेचा पंचनामा केला. पाहणीत अनधिकृत उत्खनन व डोंगरफोड करून सपाटीकरण होत असल्याचे स्पष्ट झाले. प्रशासनाने तात्काळ हे काम थांबवून, घटनास्थळावरून पोकलँड हुंडाई टू टेन हे उत्खननासाठी वापरलेले यंत्र जप्त केले आहे.
मिळकत मालक राकेश शर्मा आणि विकासक यांनी या कामासाठी कोणतीही शासकीय परवानगी घेतली नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तींविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
या धडक कारवाईमध्ये हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने, पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले, हवेली तहसीलदार किरण सूरवसे, मंडलाधिकारी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे भाग घेतला.
-----------------------------------------
#Pune
#Bibwewadi
#HillCutting
#EnvironmentalProtection
#IllegalExcavation
#DistrictCollector
#ActionTaken
#Maharashtra
Reviewed by ANN news network
on
५/१२/२०२५ ०४:१४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: