या भेटीदरम्यान आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार विक्रम काळे, आमदार जितेश अंतापूरकर, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसीलदार भरत सूर्यवंशी, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलिमा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहीद जवान सचिन वनंजे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, "भारतीय लष्करातील जवान सचिन यांचा मृत्यू ही अत्यंत दुःखद घटना आहे. या दुःखाच्या क्षणी शासन सचिन यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे."
यावेळी त्यांनी शासनाच्या वतीने शहीद सचिन यांच्या कुटुंबीयांना विविध प्रकारची मदत जाहीर केली. यामध्ये घरकुल योजनेत घर, त्यांच्या पत्नी किंवा भावाला शासकीय नोकरी आणि त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी व भविष्यासाठी आर्थिक तरतूद यांचा समावेश आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांनी तहसीलदारांना शहीद सचिन यांच्या पेन्शनची कार्यवाही त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच, शहीद सचिन वनंजे यांना शहिदाचा दर्जा मिळावा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
---------------------------------------
#Maharashtra
#AjitPawar
#SachinVananje
#MartyredSoldier
#IndianArmy
#GovernmentSupport
#Condolence
#Nanded
Reviewed by ANN news network
on
५/१२/२०२५ ०४:१०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: