या निवडीनंतर बोलताना महेंद्रशेठ घरत म्हणाले, "गुफरान तुंगेकर यांनी गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रियपणे काम केले आहे. तरुणांना नेतृत्व करण्याची संधी मिळावी, या भूमिकेतून त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा आहे आणि ते सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहेत. आगामी उरण नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडी म्हणून निश्चितपणे वर्चस्व गाजवेल."
आज 'सुखकर्ता' बंगल्यावर महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली सौरभ खरे यांच्यासह अनेक तरुणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मिलिंद पाडगावकर यांनी या नवीन सदस्यांचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी काँग्रेसचे उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, माजी नगरसेविका अफशा मुखरी, निर्मला पाटील, चंदा मेवाशी, मार्तंड नाखवा, मुरलीधर ठाकूर, अखलाख शिलोत्री, अश्विन नाईक यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------------
Reviewed by ANN news network
on
५/१२/२०२५ ०५:५८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: