विश्रांतवाडी (पुणे): एअरपोर्ट जवळील सावंत पेट्रोल पंप समोरील चौकात २७ मे रोजी दुपारी ३ वाजता झालेल्या अपघातात २३ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला आहे. एकता भरत पटेल ही युवती पिंपळे गुरव येथील रहिवासी होती.
सांगवी येथील ५२ वर्षीय डंपर चालकाने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात डंपर चालवला. त्याने मोटारसायकलवर जाणाऱ्या एकता पटेल यांना मागून जोरदार धडक दिली. या धडकेत ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला.
एकता पटेल ही शिवगणेश चौक, सुदर्शन हॉस्पिटल जवळील वरदराज बिल्डिंग समोर राहत होती. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३०/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अनिल पाडेकर याचे नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.
----------------------------------------------------------------------------------------------
#RoadAccident #FatalAccident #Vishrantwadi #TrafficSafety #PuneAccident

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: