वारजे येथे ६७ वर्षीय महिलेला १९.२९ लाख रुपयांना ठकविले


वारजे (पुणे):
वारजे येथील ६७ वर्षीय महिलेची पॉलिसी पैशाच्या नावाने फसवणूक करून १९,२९,२९२ रुपयांचे नुकसान करण्याचा प्रकार घडला आहे. १८ जानेवारी ते ६ मार्च दरम्यान ही फसवणूक करण्यात आली.

अज्ञात मोबाइल धारकाने फिर्यादीला मोबाइलवर फोन करून पॉलिसीचे पैसे देण्याचे बहाणे केले. त्यांनी महिलेचा विश्वास संपादन करून तिच्या बँक खात्यावरून वेळोवेळी ऑनलाइन ट्रान्सफर करून पैसे काढले.

या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२१/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३१९(२), ३१८(४), ३(५) तसेच आयटी कायदा कलम ६६(डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगडे याचे नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------

#OnlineFraud #PolicyFraud #SeniorCitizenFraud #WarjeCrime #CyberFraud

वारजे येथे ६७ वर्षीय महिलेला १९.२९ लाख रुपयांना ठकविले वारजे येथे ६७ वर्षीय महिलेला १९.२९ लाख रुपयांना ठकविले Reviewed by ANN news network on ५/२८/२०२५ ०६:१२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".