कोथरूड (पुणे): कोथरूड येथील ६४ वर्षीय व्यक्तीची साइबर फसवणूक करून ११,८०,६०० रुपयांचे नुकसान करण्याचा प्रकार घडला आहे. १३ मे रोजी ऑनलाइन माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली.
अज्ञात मोबाइल धारकाने फिर्यादीला बँकेची व्हेरिफिकेशन करण्याच्या नावाने एपीके फाइल दिली. या फाइलद्वारे त्यांनी फिर्यादीच्या मोबाइलवर नियंत्रण मिळवले आणि त्यांच्या संमतीशिवाय बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर केले.
या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४१/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२) तसेच आयटी कायदा कलम ६६(डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विक्रमसिंह कदम याचे नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.
---------------------------------------------------------------------
#CyberCrime #OnlineFraud #BankingFraud #KothrudCrime #DigitalFraud

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: