डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४३ वा पदवीदान समारंभ
रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४३ वा पदवीदान समारंभ आज (१४ मे २०२५) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला
या कार्यक्रमात कृषीमंत्री डॉ. माणिकराव कोकाटे, पालकमंत्री डॉ. उदय सामंत, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, कुलगुरू डॉ. संजय भावे आणि इतर मान्यवर उपस्थित होते
राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, की विद्यापीठाने कृषी क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीत चांगलं काम केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेती, फलोत्पादन आणि मत्स्यपालनाचं महत्त्व सांगितलं आहे
कृषीमंत्री डॉ. कोकाटे यांनी विद्यापीठाच्या चांगल्या परंपरेचा उल्लेख केला आणि कृषी संशोधनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला
पालकमंत्री डॉ. सामंत यांनी पदवीदान समारंभातील पारंपरिक गाऊनऐवजी भारतीय पेहराव वापरण्याची सूचना केली.
या कार्यक्रमात पीएच.डी. आणि सुवर्णपदक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
---------------------------------
#KonkanKrishiVidyapeeth
#Convocation
#Agriculture
#Maharashtra
#Farming

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: