"पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला आवश्यक असणारे सर्व कामकाज विहित वेळेत पार पाडणारे कार्यतत्पर अधिकारी म्हणून उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी काम केले. इतरांसाठी आदर्श ठरणारे अधिकारी म्हणून विठ्ठल जोशी यांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल," असे गौरवाद्गार आयुक्त सिंह यांनी काढले.
महानगरपालिकेतील दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात संपन्न झालेल्या निरोप समारंभात आयुक्त सिंह यांच्या हस्ते विठ्ठल जोशी यांचा भक्ती-शक्ती समुह शिल्प, मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
जोशी यांच्याकडे महानगरपालिकेत सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी होती. या जबाबदारीसह आयुक्तांनी सोपविलेली सर्व प्रशासकीय कामे त्यांनी विहित वेळेत पूर्ण केली. पीसीएमसी@५०, १०० दिवस कृती आराखडा आणि राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता अशा विविध उपक्रमांतर्गत त्यांच्यावर टाकण्यात आलेली जबाबदारी त्यांनी अतिशय चोखपणे पार पाडल्याचा उल्लेख आयुक्त सिंह यांनी केला.
कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, मुख्य वित्त लेखा अधिकारी प्रवीण जैन आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विठ्ठल जोशी यांनी आपल्या भाषणात सांगितले, "पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय असाच आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली येथे काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी दाखवलेला विश्वास, आदरयुक्त वागणूक, कमालीची संवेदनशीलता, सुशील सुहृदयता कायमची मनावर कोरलेली राहील."
जोशी यांनी महापालिकेतील सर्व अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त, शहर अभियंता, विभागप्रमुख, डॉक्टर्स, कर्मचारी महासंघ आणि प्रशासन विभागातील सर्व सहकाऱ्यांचेही आभार मानले.
------------------------------
#PCMC #MunicipalAdministration #VitthalJoshi #PublicService #PimpriChinchwad #AdministrativeExcellence #CivilServant #MaharashtraAdministration #PublicOfficer #DepututionComplete

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: